एक्स्प्लोर

Aditya Singh Rajput Death: अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू; घराच्या बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Aditya Singh Rajput Demise: अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू झाला आहे.

Aditya Singh Rajput Demise: प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूतचा (Aditya Singh Rajput)  मृत्यू झाला आहे. आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह सोमवारी (22 मे) दुपारी त्याच्या अंधेरी (Andheri) येथील घरातील बाथरूममध्ये आढळला. आदित्यच्या एका  मित्राला आदित्य हा मृतावस्थेत आढळला, त्यानंतर त्या मित्राने आणि इमारतीच्या वॉचमॅनने आदित्यला रुग्णालयात नेले. रुग्णालयात आदित्यला मृत घोषित करण्यात आले. आदित्यच्या मृत्यूमागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

वयाच्या 17 व्या वर्षी केली होती करिअरला सुरुवात

आदित्य सिंह राजपूतने वयाच्या 17 व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रातील  करिअरला सुरुवात केली होती. आदित्यचा जन्म दिल्लीत झाला. त्यांचे कुटुंब उत्तराखंड येथील आहे. आई,वडील, एक मोठी बहीण असं आदित्यचं कुटुंब आहे. आदित्यच्या मृत्यूनं मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे.   'स्प्लिट्सविला' या शोमध्ये आदित्य सिंह राजपूतने काम केले होते. तसेच त्यानं काही जाहिरातींमध्ये देखील काम केले. 

अभिनेता आदित्य सिंह राजपूत हा त्याच्या अंधेरी भागातील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूचा तपास चालू आहे, अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेला मुंबई पोलिसांनी दिली आहे.

आदित्य हा सोशल मीडियावर अॅक्टिव होता. तो वेगवेगळ्या लूकमधील  फोटो आणि रिल्स सोशल मीडियावर शेअर करत होता. त्याला इन्स्टाग्रामवर 520K फॉलोवर्स आहेत.  आदित्यनं काल इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होती. या फोटोवर 'संडे फंडे विथ बेस्टी', असं लिहिलं होतं. ही आदित्यची शेवटी इन्स्टाग्राम पोस्ट ठरली. 

चित्रपट आणि शोमध्ये केलं होतं काम

आदि राजा,  मॉम अँड डॅड: द लाईफलाईन लव्ह, लव्हर्स अशा चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं होतं. तसेच  राजपुताना, लव्ह, कोड रेड, बॅड बॉय या मालिका आणि शोमध्ये देखील त्यानं काम केलं होतं. स्प्लिट्सविला या कार्यक्रमाच्या 9 व्या सीझनमध्ये त्यानं सहभाग घेतला होता. जवळपास 300 जाहिरातींमध्ये आदित्यनं काम केलं होतं. आदित्य हा कास्टिंग डायरेक्टर म्हणून देखील काम करत होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Entertainment News Live Updates 22 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget