Soybean News: गेल्या वर्षभराहूनही अधिक काळासाठी सोयाबीन हमीभावावरून नाराज शेतकऱ्यांची सोयाबीनच्या विक्रीसाठीची धडपड सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदी केंद्र ठप्प होती. आता खरेदी केंद्र सुरू झाली आहेत पण सोयाबीनचा काटा होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Soybean Farmer)राज्यातील सोयाबीन खरेदी आता केवळ 31 जानेवारीपर्यंतच सुरू राहणार असल्याने प्लीज सोयाबीन खरेदी केंद्रांच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे हजारो शेतकरी प्रतीक्षेत आहेत. हमीभावाने सोयाबीन विक्री करता यावी यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सोयाबीनचा काटा होण्यास 3-3 दिवस प्रतीक्षा करावी लागत असून काही जणांना केंद्रावरच मुक्काम करावा लागतोय. सोयाबीन खरेदीची मुदत अवघ्या चार दिवसात संपणार असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. (Soybean Procurement Centre)
सोयाबीन शेतकऱ्यांसाठी एका बाजूला महायुतीच्या कोट्यवधींच्या बाता सुरू असताना खरेदी केंद्रांच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला आहे. आधी बारदाना नव्हता म्हणूनच सोयाबीन विक्री रखडली, आता खरेदी केंद्राबाहेर विक्रीसाठी रांगच रांग आहे. त्यामुळे हजारो शेतकरी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी प्रतीक्षेत आहेत. वाहनांच्या किरायाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. (Soybean)
लातूरचे 14 हजार शेतकरी अद्यापही खरेदीच्या प्रतीक्षेत
लातूर जिल्ह्यात 16 ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून हमीभावाने सोयाबीन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील जवळपास 47 हजार 671 शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी केली असून, यापैकी जवळपास बारा हजार 463 शेतकऱ्यांच्या एकूण जवळपास तीन लाख क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आलीय. ऑनलाईन नोंदणी केलेले जवळपास 14 हजार शेतकरी अद्यापही खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. पाच दिवसांनी खरेदीची मुदत संपणार असल्यामुळे या मुदतीत सोयाबीनची खरेदी होणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकलाय. (Soybean Purchase)
खरेदी केंद्रातील प्रतीक्षा आर्थिक गणित जुळेना
खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन आलेले वाहने किमान चार ते पाच दिवस काटा होण्यासाठी लागत असल्याने किराया भरमसाठ होत आहे. एका कट्ट्याला 80 ते 100 रुपये किराया पडतो... चार दिवस होल्डिग चार्जेस बाराशे ते दीड हजार रुपये द्यावे लागतात. ड्रायव्हर भत्ता वेगळा. स्वतःच्या जीवनाचा खर्च वेगळा.या सर्व प्रतीक्षेत प्रती ट्रॅक्टर किमान नऊ ते 14 हजारापर्यंत खर्च होतोय यामुळे क्विंटल मागे आठशे रुपयाचा वाढून मिळणारा मूल्य नको तिथे खर्च होतो. पाच ते सहा दिवस वाढणारा मनस्ताप वेगळाच. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठी वाट पाहण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा: