Pradosh Vrat 2025 : हिंदू धर्मात प्रदोष व्रताला (Pradosh Vrat 2025) विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि पार्वती देवीची विधीवत पूजा केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, हे व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला पाळलं जातं. जेव्हा हे व्रत सोमवारी येतं, तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत (Som Pradosh Vrat 2025) म्हणतात. याप्रमाणे 27 जानेवारीला आलेलं हे व्रत सोमवारी आलं आहे, त्यामुळे त्याला सोम प्रदोष व्रत म्हटलं जातं.
धार्मिक मान्यतेनुसार, हे व्रत पाळल्याने जीवनात सुख, शांती, यश आणि समृद्धी येते. हे व्रत विशेषतः महिलांसाठी खूप फायदेशीर मानलं जात, कारण यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. पण या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. या दिवशी काही काम करणं निषिद्ध मानलं जातं. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही तर भगवान शंकर तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि येत्या काळात तुम्हाला आर्थिक संकटालाही सामोरं जावं लागू शकतं. अशा स्थितीत, प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये? जाणून घेऊया.
प्रदोष व्रताच्या दिवशी काय करू नये? (Pradosh Vrat Don'ts)
प्रदोष व्रतात काही गोष्टी अजिबात करू नयेत. या दिवशी मांसाहार, दारू, सिगारेट आणि नशा टाळावी. या दिवशी उगाच कुणावरही रागावणं, भांडणं आणि खोटं बोलणं टाळावं. याशिवाय शिवलिंगावर तुकडा तांदूळ आणि चंदन अर्पण करणंही निषिद्ध मानलं जातं. असं केल्याने भगवान शिव क्रोधित होऊ शकतात आणि यामुळे पूजेचं पूर्ण फळ प्राप्त होत नाही, असं म्हणतात.
प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे? (Pradosh Vrat Do's)
या दिवशी सकाळी सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर भगवान शंकराची यथायोग्य पूजा करावी. या दिवशी शिवलिंगाला बेलपत्र, गंगाजल, दूध आणि दही अर्पण करावं. यासोबतच शिवलिंगाचा जलाभिषेक आणि रुद्राभिषेकही करावा. याशिवाय या दिवशी गरीब आणि ब्राह्मणांना अन्नदान करणं देखील खूप शुभ मानलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: