Masik Shivratri 2025 : हिंदू धर्मात मासिक शिवरात्रीला खूप महत्त्व आहे. मासिक शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला पाळली जाते. हा दिवस भगवान शिव आणि पार्वती देवीला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकराची आराधना करून व्रत केल्यास सर्व दु:ख आणि संकटं दूर होतात, भक्तांना अपेक्षित लाभ होतो,
असा विश्वास आहे. 2025 मधील पहिली मासिक शिवरात्री सोमवार, 27 जानेवारीला आली आहे. या दिवशी काही छोटे ज्योतिषीय उपाय (Masik Shivratri Remedies) केल्यास भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते आणि व्यक्तीच्या जीवनाचा कायापालट होतो, हे उपाय नेमके कोणते? जाणून घेऊया.


शिवरात्रीला करा हे छोटे उपाय, उजळेल भाग्य


शिवलिंगाला अभिषेक करा


मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गंगाजल, दूध, दही, मध, तूप इत्यादींनी अभिषेक करावा. नंतर बेलपत्र, भांग आणि धतुरा अर्पण करा. दिवा लावा आणि 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करा. या दिवशी गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. असं केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात, असं मानलं जातं.


या दिवशी उपवास ठेवा


मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वती देवीची पूजा करून उपवास केला जातो. या दिवशी उपवास केल्याने मनाला शांती मिळते, सर्व ताण-तणाव दूर होतो, अशी मान्यता आहे. याशिवाय या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. त्यानंतर संध्याकाळी भगवान शंकराला प्रसाद अर्पण करावा. असं केल्याने तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते.


प्रलंबित कामासाठी उपाय


जर तुमचं एखादं काम पूर्ण होत असताना मधेच बिघडलं किंवा तुमच्या कामात अचानक अडथळे येत असतील तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात दिवा लावावा आणि शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाने ओम लिहावं. तसेच शिवलिंगाला एक रुपया अर्पण करा आणि पूजेनंतर तो रुपया घ्या आणि आपल्या तिजोरीत ठेवा. असं केल्याने तुमचं काम पूर्ण होऊ शकतं.


इच्छा पूर्ण करण्यासाठी हे करा


शिवरात्रीच्या दिवशी तुमची इच्छा कागदावर लिहा, ती लाल कपड्यात बांधा आणि नंतर वाहत्या पाण्यात सोडा. असं केल्याने आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते, असा विश्वास आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Astrology : तब्बल 57 वर्षांनंतर मीन राशीत 6 ग्रहांची युती; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार