Entertainment News Live Updates 21 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम घडवून आणणाऱ्या 'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati) या जगद्विख्यात कार्यक्रमाचं नवं मराठी पर्व लवकरच सुरू होणार आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. आता अमृता फडणवीस यांना कलेची आवड आहे. त्यामुळे त्या आता 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला पोहोचल्या आहेत.
धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) हा सिनेमा आहे. महाराष्ट्रात सध्या 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' या सिनेमाचाच बोलबाला आहे. पहिल्या आठवड्यात 'धर्मवीर' सिनेमाने 13.87 कोटींची कमाई केली आहे. तर आता दुसऱ्या आठवड्यातदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारीदेखील अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला आहे.
मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट दिग्दर्शक, चांगले तंत्रज्ञ आणि कसदार अभिनेते आहेत यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दर्जेदार मराठी चित्रपटांना कान चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर नेण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी कान चित्रपट महोत्सवात व्यक्त केला.
छोटा पडदा गाजवलेला आणि बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'जिना जरुरी हैं' ( Jeena Zaroori Hai) असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणं ऐकून सिद्धार्थचे चाहते भावूक झाले आहेत.
साऊथ स्टार ज्युनियर एनटीआरने (Jr.NTR) नुकताच त्याचा 39वा वाढदिवस साजरा केला. त्याचा यंदाचा वाढदिवस त्याच्यासाठी आणखी खास बनला आहे. यंदाच्या वर्षी रिलीज झालेला त्याचा ‘RRR’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता या खास दिवसाच्या निमित्ताने त्याला 'KGF: Chapter 2'चे (KGF 2) दिग्दर्शक प्रशांत नील यांच्याकडून खास भेट मिळाली आहे.
बेबी डॉल गर्ल कनिका कपूर दुसऱ्यांदा चढली बोहल्यावर; विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल
मराठी मनोरंजन विश्वातील 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या हनिमूनचा आनंद लुटत आहे. या दरम्यान अभिनेत्रीने बीचवर धमाल करतानाचा ड्रोन व्हिडीओ शेअर केला आहे.
'फुलपाखरू' फेम हृता दुर्गुळेने शेअर केले लग्नातील खास फोटो!
'निर्मल पाठक की घरवापसी' हा एक स्पेशल ड्रामा आहे, जो मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना वास्तविकतेची जाणीव करून देतो. यात अभिनेता वैभव तत्ववादीने (Vaibhav Tatwawadi) निर्मल पाठक या तरूणाची भूमिका साकारली आहे, जो 24 वर्षांनंतर त्याच्या मूळगावी परतला आहे आणि त्याची कथा त्याचे मूळ शोधण्याच्या प्रवासाच्या अवतीभोवती फिरते. वैभव तत्ववादीप्रमाणेच निर्मल पाठक लाजाळू व संकुचित वृत्तीचा आहे आणि याच बाबीमुळे त्याला सहजपणे भूमिकेमध्ये सामावून जाता आले, असे वैभव सांगतो.
'बुर्ज खलीफा'मध्ये हक्काचं घर! अभिनयात पदार्पण करण्याआधी 'या' क्षेत्रात काम करत होते मोहनलाल
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता मोहनलाल (Mohanlal) यांचा आज 62 वा वाढदिवस. मोहनलाल यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांचे पूर्ण नाव मोहनलाल विश्वनाथ नायर असं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबाबत काही खास गोष्टी.
मालिका विश्वात सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेची जोरदार हवा आहे. या मालिकेत 'अरुंधती'ची म्हणजेच 'आई'ची भूमिका साकारलीये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी... नुकताच त्यांनी आपल्या पहिल्यावहिल्या फोटोशूटचा एक फोटो शेअर केला आहे.
कार्तिक आर्यन-कियारा अडवाणीचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’, आणि कंगना रनौतचा चित्रपट 'धाकड'च्या निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच हे चित्रपट ऑनलाईन लीक झाले आहेत. पायरेटेड साईट्सवरूनही लोकांनी ते डाऊनलोड करायला देखील सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या व्यवसायावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही, तर नुकतेच रिलीज झालेले ‘जयेशभाई जोरदार’, ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हे चित्रपट देखील ऑनलाईन पायरसीचे बळी ठरले आहेत.
वाचा संपूर्ण बातमी एका क्लिकवर
टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक 'बिग बॉस 14' ची विजेती बनल्यापासून सतत चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
Aditya Chopra Birthday : ज्येष्ठ चित्रपट निर्माते यश चोप्रा आणि पामेला चोप्रा यांचा मुलगा आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रा (Aditya Chopra) आज (21 मे) आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 21 मे 1971 रोजी मुंबईत झाला. ‘चांदनी’, ‘लम्हे’ आणि ‘डर’ या सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाचे यशस्वी दिग्दर्शन केले. आदित्य चोप्राने यशराज बॅनर्सच्या 1997मध्ये रिलीज झालेल्या 'दिल तो पागल है' या चित्रपटासाठी संवादही लिहिले होते.
आदित्य चोप्रा यांनी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) हिच्याशी लग्नगाठ बांधली. आदित्य आणि राणीची ही लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. आदित्य स्वभावाने खूप शांत आहे, तर राणी एकदम चुलबुली.. आधी त्या घोघांची केवळ मैत्री होती. दोघांचे एकमेकांशी चांगले बॉन्डिंग होते, पण मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते दोघांनाही कळले नाही.
वाचा संपूर्ण बातमी एका क्लिकवर
Cannes Film Festival : आर. माधवनच्या दिग्दर्शनातील पदार्पण ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’चा भव्य प्रीमियर पॅलेस डेस फेस्टिव्हल्सच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाला. माधवन आणि इस्रोचे प्रतिभाशाली अंतराळ शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी रेड कार्पेटवर शानदार एन्ट्री केली. हा चित्रपट शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्यावर आधारित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला टाळ्यांचा कडकडाट झाला, इतकेच नाही, तर या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले.
चित्रपट महोत्सवात त्याच्या चित्रपटाला मिळालेल्या कौतुकाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, अभिनेता-दिग्दर्शक माधवन याने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘मी भारावून गेलो आहे आणि उत्साहित आहे. टीम रॉकेट्रीमध्ये असलेल्या सर्वांसाठीच हा अभिमानाचा क्षण आहे. यासाठी मी सर्वांचा कृतज्ञ आहे. तुमच्या सर्व प्रेम आणि पाठींबा याबद्दल धन्यवाद. हा चित्रपट 1 जुलै रोजी रिलीज होणार आहे.’
पार्श्वभूमी
Entertainment Live :मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेन्ण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'मी वसंतराव'ने चित्रपटगृहात पूर्ण केले 50 दिवस!
जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'मी वसंतराव' या चित्रपटानं सिनेमागृहात यशस्वी पन्नास दिवस पूर्ण केले आहेत. चित्रपटानं समिक्षकांकडून, प्रेक्षकांकडून आणि अनेक मान्यवरांकडून वाहवा मिळवली. सध्या अनेक बॅालिवूड, दाक्षिणात्य, मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र या स्पर्धेत 'मी वसंतराव' या चित्रपटानं पन्नासाव्या दिवशीही आपली जागा कायम ठेवत बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावला आहे.
एका ध्येयवेड्या कलाकाराची जीवनकथा यात दाखवण्यात आली असून प्रत्येकालाच आपले ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक उर्जा देणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहून पद्मविभूषण शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनीही पुढील वीस वर्षे काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचं सांगितलं. राहुल देशपांडेंमध्ये त्यांना वसंतरावांचा भास झाला. हा केवळ चित्रपट नसून यातून बोध घेण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी सांगितलं तर आपली संस्कृती किती श्रीमंत आहे, हे या चित्रपटातून कळतं, अशी प्रतिक्रिया अभिनेता मकरंद देशपांडे यांनी दिली. हा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट असून राहुलनं वसंतराव अगदी हुबेहुब साकारल्याचं अभिनेते नाना पाटेकर म्हणाले. याव्यतिरिक्त शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, केदार शिंदे, सचिन खेडेकर, आदित्य सरपोतदार, रवी जाधव, रेणुका शहाणे, अश्विनी भावे, अंकुश चौधरी, स्वप्नील बांदोडकर, वैदेही परशुरामी, गितांजली कुलकर्णी आदी नामवंतांनीही सकारात्मक प्रतिक्रया दिल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -