एक्स्प्लोर

Happy Birthday Aditya Chopra : पहिल्याच भेटीत राणी मुखर्जीच्या प्रेमात पडले आदित्य चोप्रा, कुटुंबाची नाराजी पत्करत ‘या’ देशात बांधली होती लग्नगाठ!

Aditya Chopra Birthday : आदित्य चोप्रा यांनी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्याशी लग्नगाठ बांधली. आदित्य आणि राणीची ही लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.

Aditya Chopra Birthday : ज्येष्ठ चित्रपट निर्माते यश चोप्रा आणि पामेला चोप्रा यांचा मुलगा आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रा (Aditya Chopra) आज (21 मे) आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 21 मे 1971 रोजी मुंबईत झाला. ‘चांदनी’, ‘लम्हे’ आणि ‘डर’ या सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाचे यशस्वी दिग्दर्शन केले. आदित्य चोप्राने यशराज बॅनर्सच्या 1997मध्ये रिलीज झालेल्या 'दिल तो पागल है' या चित्रपटासाठी संवादही लिहिले होते.

आदित्य चोप्रा यांनी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) हिच्याशी लग्नगाठ बांधली. आदित्य आणि राणीची ही लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. आदित्य स्वभावाने खूप शांत आहे, तर राणी एकदम चुलबुली.. आधी त्या घोघांची केवळ मैत्री होती. दोघांचे एकमेकांशी चांगले बॉन्डिंग होते, पण मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते दोघांनाही कळले नाही.

हॉटेलमध्ये झाली पहिली भेट!

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा पहिल्यांदा एका रेस्टॉरंटमध्ये भेटले होते. त्यावेळी राणीने 'राजा की आयेगी बारात' चित्रपटात काम केले होते. पहिल्याच भेटीतच आदित्य राणीच्या प्रेमात पडले होते. यानंतर त्यांनी चित्रपट निर्माता करण जोहरला राणीला 'कुछ कुछ होता है'मध्ये कास्ट करण्यास सांगितले. या चित्रपटाच्या यशानंतर दोघांनी गुपचूप एकमेकांना डेट केले.

राणीसाठी घरही सोडले!

आदित्य चोप्रा यांचे वडील यश चोप्रा यांना त्यांचे राणी मुखर्जीसोबतचे नाते अजिबात पसंत नव्हते, असे म्हटले जाते. कारण, आदित्यचे आधीच लग्न झाले होते. वडील यश चोप्रा यांचा इतका आक्षेप होता की आदित्यला घर सोडावे लागले. या वादामुळे आदित्यला अनेक दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले. आदित्य चोप्रा यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल खन्ना होते. आदित्यने 2009मध्ये पायलला घटस्फोट दिला आणि 2014मध्ये राणीशी लग्न केले.

आदित्य चोप्रा आणि राणीच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच काळापासून मीडियात येत होत्या. मात्र, या बातमीवर दोघांनीही शिक्कामोर्तब केले नव्हते. दोघांनी 2014मध्ये इटलीमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थिती लग्न केले. त्यांना आता ‘आदिरा’ नावाची एक मुलगी आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 19 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Jr NTR : ज्युनियर एनटीआरच्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा! धमाकेदार मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

Cannes Film Festival 2022 : ती गुलाबी परी जणू... ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar:Sanjay Raut काँग्रेसचा पाळलेला कुत्रा,डोम्या नाग; संतोष बांगरांची सडकून टीकाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 15 March 2025Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02PM TOP Headlines 02 PM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
Embed widget