Entertainment News Live Updates 20 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sanjay Leela Bhansali : 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संजय लीला भन्साळींचा 'हीरामंडी' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
Sanjay Leela Bhansali On Heeramandi : प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात. संजय लीला भन्साळी हे ऐतिहासिक आणि सुपरहिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आगामी हीरामंडी (Heeramandi) या वेबसिरीजमधून ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. नुकताच हीरामंडीचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हीरामंडीचा फर्स्ट लूक चाहत्यांना फार आवडतोय.
Premas Rang Yave: प्रेमाला कुठला रंग, कुठलं रूप नाही; 'प्रेमास रंग यावे' मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Premas Rang Yave: आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे नेमकं कशावर प्रेम करतो? त्या व्यक्तीच्या रंग-रूपावर, श्रीमंतीवर, की त्या व्यक्तीच्या चांगुलपणावर, त्याच्या सुंदर मनावर? 20 फेब्रुवारीपासून, सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेली 'प्रेमास रंग यावे' (Premas Rang Yave) ही मालिका नेमकी ह्याच प्रश्नाभोवती फिरते. ही गोष्ट आहे एका अत्यंत हुशार, सालस, सहृदयी अक्षराची आणि एका चांगल्या मनाच्या पण खुशालचेंडू, न्यूनगंडाने भरलेल्या आणि पारंपरिक अर्थाने देखणा नसलेल्या सुंदरची.
Prajakta Koli: ‘ये शादी नही हो सकती’ मध्ये प्राजक्ता कोळी साकारणार प्रमुख भूमिका
Prajakta Koli: यूट्युबर, प्रसिद्ध सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीचा (Prajakta Koli) चाहता वर्ग मोठा आहे. झी थिएटरच्या ‘ये शादी नही हो सकती’ या टेलिप्लेमधून प्राजक्ता ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या टेलिप्लेमध्ये प्राजक्ता कोळी ही प्रिया नावाच्या तरुणीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या टेलिप्लेमधील भूमिकेबाबत प्राजक्ता म्हणाली, “ये शादी नही हो सकतीमध्ये काम केल्यानंतर सूरज बडजात्यांच्या विवाह या चित्रपटाची मला आठवण झाली. कारण तो चित्रपट पाहिल्यानंतर मी लग्न करण्यासाठी उत्सुक झाले होते. ये शादी नही हो सकती या टेलिप्लेमध्ये काम केल्यावर, आपल्यासोबत कायम एक पार्टनर असणे ही एक छान गोष्ट असते, याची जाणीव मला झाली.'
Shah Rukh Khan: 'कोणती भूमिका साकारायला आवडेल?', 'आवडता सीन कोणता?' चाहत्यांचे प्रश्न; उत्तर देत शाहरुख म्हणाला...
Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. आता आस्क एसआरके (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे.
Now I like to play what I think people would like me to play…I have evolved as an actor I think. My personal likes are diminishing. https://t.co/7cT5BqwAbO
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 20, 2023
Ayushmann Khurrana : कौतुकास्पद! आयुष्मान खुरानाची युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी नियुक्ती; पोस्ट शेअर करत दिली माहिती
Ayushmann Khurrana On UNICEF India National Ambassador : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या चर्चेत आहे. युनिसेफ इंडियाच्या (UNICEF India) वतीने आयुष्मानची राष्ट्रीय सदिष्छा दूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्याने अनेक गरजू मुलांची मदत करण्यासाठी युनिसेफशी हातमिळवणी केली आहे.
View this post on Instagram
Kili Paul : 'परदेसिया' गाण्यावर थिरकला किली पॉल; व्हिडीओ व्हायरल
Kili Paul : सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. इन्टाग्रामवरील रिल्स नेटकऱ्यांना बघायला आवडतात. वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरील डान्सचे रिल्स सध्या अनेक लोक सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. टांझानियाचा (Tanzania) किली पॉल (Kili Paul) हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. किली पॉल हा जरी टांझानियामध्ये राहात असला, तरी बॉलिवूडवर त्याचं विशेष प्रेम असल्याचं पाहायला मिळतं. तो नेहमीच बॉलिवूडच्या गाण्यांवर रिल्स तयार करत असतो. नुकताच त्यानं 'परदेसिया' या 90 च्या दशकातील प्रसिद्ध गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
View this post on Instagram
Bhargavi Chirmuley : भार्गवीचं 'येतोय तो खातोय' नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!
Bhargavi Chirmuley : मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने (Bhargavi Chirmuley) आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता भार्गवी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. 'येतोय तो खातोय' (Yetoy To Khatoy) हे तिचं नवं नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे. हे लोकनाट्य असल्याने भार्गवीचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
S. K. Bhagavan : सिनेदिग्दर्शक एस.के भगवान यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
S. K. Bhagavan : सिनेदिग्दर्शक एस.के भगवान यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.
Kannada film director SK Bhagavan passes away in Bengaluru.
— ANI (@ANI) February 20, 2023
"I was very saddened to hear the news of renowned director of Kannada film industry SK Bhagavan's death. I pray that God gives strength to his family to bear this pain," tweets Karnataka CM Basavaraj Bommai pic.twitter.com/tzU7vLBkS8