Entertainment News Live Updates 20 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Gadad Andhar Teaser: पाणी आणि मानवी जीवन यांचं नातं अतूट आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अवतार : द वे आॅफ वॅाटर' या हॅालिवूड चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालचं विश्व दाखवण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत मराठी चित्रपटही कुठेच मागे नसल्याचं दर्शवणारा सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' हा चित्रपट 3 फेब्रुवारी 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. पाण्याखालचं अद्भुत आणि रहस्यमय विश्व दाखवणारा 'गडद अंधार' चा टीझर उत्सुकता वाढवणारा आहे. या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याबाबतचं कुतूहल जागं करणाऱ्या या टिझरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सिनेप्रेमींद्वारे 'गडद अंधार'चा टिझर शेअर करण्यात येत आहे.
Vivek Agnihotri: 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली. 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा (Saeed Akhtar Mirza) यांनी 'द कश्मीर फाईल्स हा चित्रपट कचरा आहे.' असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. आता सईद अख्तर मिर्झा यांच्या या वक्तव्यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Vivek Agnihotri: 'द कश्मीर फाईल्स'ला कचरा म्हणणाऱ्या दिग्दर्शकांना विवेक अग्निहोत्रींचं उत्तर; म्हणाले, 'द दिल्ली फाईल्सनंतर...'
Amazon Music Best Of 2022 : 2022 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या वर्षात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले. हे सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सिनेमे आणि वेबसीरिजसह या वर्षात अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. रोमॅंटिक, रिमिक्स, पॉप सॉंग अशा वेगवेगळ्या पद्धतीची गाणी या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.
Best Of 2022 : अॅमेझॉन म्यूझिकने जाहीर केली वर्षातील सर्वोत्कृष्ट गाण्यांची यादी; जाणून घ्या कोणती गाणी ठरली बेस्ट...
Avatar The Way Of Water: दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron) यांच्या 'अवतार' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. 'अवतार 2' (Avatar 2) म्हणजेच 'अवतार द वे ऑफ वाटर' (Avatar The Way Of Water) हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. विन डिझेल, केट विन्सलेट यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी अवतार: द वे ऑफ वॉटरमध्ये काम केले आहे.
Avatar The Way Of Water: जेक सुली ते नेतिरी; अवतारमधील कलाकार आहेत कोट्यवधींचे मालक
Kuttey Trailer Out Now : बॉलिवूडचा सुपरस्टार अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'कुत्ते' (Kuttey) सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. लोकप्रिय दिग्दर्शिक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतो. पण यंदाचं बिग बॉस मराठीचं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडलं. अखेर आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.
Hrithik Roshan Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) सध्या चर्चेत आहेत. अनेकदा दोघे एकत्र दिसतात. आता ते दोघे विमानतळावर स्पॉट झाले आहेत. नवं वर्षाचं स्वागत हृतिक परदेशात करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
The Upcoming Projects Of OTT In 2023 : कोरोनानंतर या वर्षात अनेक सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. या वर्षाप्रमाणे पुढील वर्षातदेखील अनेक सिनेमे आणि वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. यात 'पाताल लोक 2' (Paatal Lok 2) ते 'द फॅमिली मॅन 3' (The Family Man Season 3) पर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमांचा सहभाग आहे.
Prathamesh Parab : मराठी मनोरंजनसृष्टीत आला लगीनघाईला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. अशातच अभिनेता प्रथमेश परबनेदेखील (Prathamesh Parab) लग्नासंदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रथमेशने चाहत्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं आहे.
Fan Throws Slipper At Kannada Actor Darshan: मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतात. या कलाकारांना त्यांचे चाहते ट्रोल करतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की एका प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याला (Kannada Actor) त्याच्या चाहत्यानं भर कार्यक्रमात चक्क चप्पल फेकून मारली.
Avatar The Way Of Water Box Office Collection Day 4 : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा जगभरात चांगली कमाई करत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन फक्त चार दिवस झाले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आज एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण करिअरच्या सुरुवातीला पुण्यातील एका नगरसेवकाने तिला त्रास दिला होता.
Amber Heard-Johnny Depp : अभिनेत्री एम्बर हर्ड (Amber Heard) आणि हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप (Johnny Depp) गेल्या काही दिवसांपासून मानहानीच्या खटल्यामुळे चर्चेत आहेत. न्यायाधीशांनी एम्बरला मानहानी खटल्यात दोषी ठरवले होते. अखेर हे मानहानी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न एम्बरने केला आहे.
Sohail Khan Birthday : अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक असणाऱ्या सोहेल खानचा (Sohail Khan) आज वाढदिवस आहे. 20 डिसेंबर 1970 रोजी महाराष्ट्रात सोहेलचा जन्म झाला. सोहेल हा बॉलिवूडचे लोकप्रिय पटकथा लेखक सलीम खान यांचा मुलगा आहे. तसेच तो सलमान खानचादेखील भाऊ लागतो.
Sohail Khan Birthday : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक सोहेल खान! प्रेम, पळून जाऊन लग्न ते विभक्त होणं; जाणून घ्या प्रवास...
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Urfi Javed : उर्फी जावेद 'laryngitis' या आजाराने त्रस्त; काय आहे हा आजार?
Urfi Javed diagnosed with Laryngitis : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड फॅशनसाठी ओळखली जाते. अनेकदा ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी कोणत्याही फॅशन सेन्समुळे नाह तर तिच्या तब्येतीमुळे ती चर्चेत आहे. उर्फी सध्या दुबईत आहे. दुबईच्या हॉस्पिटलमधील उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rakul Preet Singh : मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची सलग दुसऱ्यांदा चौकशी
Rakul Preet Singh : सध्या बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला (Rakul Preet Singh) मनी लाँडरिंग प्रकरणात कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने रकुल प्रीत सिंहला चौकशीसाठी बोलावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने सोमवारी (आज) अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला तस्करी आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित चार वर्ष जुन्या ड्रग्स प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते.
Vaalvi Teaser: 'दिसतं तसं नसतं'; 13 जानेवारीला प्रदर्शित होणार 'वाळवी'
Vaalvi Movie: झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी (Paresh Mokashi) हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अफलातून असते. असाच एक जबरदस्त विषय घेऊन पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. 'दिसतं तसं नसतं' अशी टॅगलाईन असलेल्या 'वाळवी' (Vaalvi) या चित्रपटाचे एक भन्नाट टीझर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असून नवीन वर्षात म्हणजेच येत्या 13 जानेवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Shubhvivah : यशोमन आपटेचं छोट्या पडद्यावर कमबॅक
Yashoman Apte On Shubhvivah : अभिनेता यशोमन आपटे (Yashoman Apte) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. याआधी रोमॅंटिक हिरोच्या भूमिकेत यशोमन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता 'शुभविवाह' (Shubhvivah) या मालिकेत तो मानसिक स्थैर्य गमावलेल्या आकाशच्या भूमिकेत दिसणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -