Hrithik Roshan Watch Kantara: 'खूप काही शिकलो...' कांतारा पाहिल्यानंतर हृतिकनं शेअर केली खास पोस्ट
'कांतारा' (Kantara) हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेता हृतिक रोशननं (Hrithik Roshan) प्रतिक्रिया दिली. नुकतेच त्याने एक ट्वीट शेअर केले आहे.
Hrithik Roshan: अभिनेता ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) 'कांतारा' (Kantara) या चित्रपटाचं अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, चित्रपटाचे कथानक यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटाचा क्लायमॅक्स बघताना अनेकांच्या अंगावर शहारे आले. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेता हृतिक रोशननं (Hrithik Roshan) प्रतिक्रिया दिली आहे.
हृतिक रोशनचं ट्वीट
हृतिकनं नुकतंच एक ट्वीट शेअर करुन कांतारा चित्रपटाबाबत सांगितलं आहे. हृतिकनं कांतारा चित्रपटाची पाहिल्यानंतर ट्वीट शेअर करुन लिहिले, 'कांतारा बघून खूप काही शिकायला मिळालं. ऋषभ शेट्टीची पावर या चित्रपटाला विलक्षण बनवते. उत्कृष्ट कथाकथन, दिग्दर्शन आणि अभिनय. क्लायमॅक्स ट्रान्सफॉर्मेशन पाहून माझ्या अंगावर शहारे आले. या चित्रपटाच्या टीमबद्दल मला आदर वाटतो. टीमचे मी कौतुक करतो. ' हृतिकच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
Learnt so much by watching #Kantara. The power of @shetty_rishab’s conviction makes the film extraordinary. Top notch storytelling, direction & acting. The peak climax transformation gave me goosebumps 🤯 Respect & kudos to the team 👏🏻
— Hrithik Roshan (@iHrithik) December 11, 2022
हृतिकच्या ट्वीटला ऋषभचा रिप्लाय
ऋषभनं हृतिकच्या ट्वीटला रिप्लाय केला. त्यानं रिप्लाय करत लिहिले, 'थँक्यू सो मच सर' या ट्वीटमध्ये ऋषभनं तीन हार्ट इमोजींचा देखील वापर केला आहे.
Thank you so much sir ❤️❤️❤️ https://t.co/f2b1rNpWU3
— Rishab Shetty (@shetty_rishab) December 11, 2022
कांतारा हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 'कांतारा'मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत. 'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: