एक्स्प्लोर

20 December In History: राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी, आजच्याच दिवशी मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले

On This Day In History: स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज (Gadge Maharaj) मानवतेचे खरे परोपकारी, सामाजिक समरसतेचं मूर्त स्वरूप म्हणजे गाडगे महाराज. गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे.

On This Day In History: स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज (Gadge Maharaj) मानवतेचे खरे परोपकारी, सामाजिक समरसतेचं मूर्त स्वरूप म्हणजे गाडगे महाराज. गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगांव येथे झाला होता. डेबूजी झिंगारजी जानोरकर असे त्यांचे नाव होते. गाडगेबाबांचे बालपण मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गेलं. गाडगे महाराज चालते फिरते विद्यापीठ होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर नातेवाईकांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्यापासून तयार केलेला पोषाख त्यांचा असायचा. गाडगे महाराज हे सामाजिक रुढी आणि परंपरेवर जोरदार प्रहार करत होते. किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर प्रबोधनाचे काम केले. गाडगेमहाराज यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होता. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली. माणसातच देव आहे असे त्यांचे मत होते. याचाच शोध ते घेत होते. संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत. गाडगे महाराजांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. 

1933: विष्णूशास्त्री वामन बापट यांची पुण्यतिथी 

विष्णूशास्त्री वामन बापट यांची आज पुण्यतिथी आहे. भाषांतरकार विष्णू वामन बापट यांनी विविध भाषांतील ग्रंथांची भाषांतरे केली. त्यांच्या नावावर 70 भाषांतरित ग्रंथ आहेत.

1970: अभिनेता सोहेल खानचा जन्मदिवस 

अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सोहेल खान याचा आज वाढदिवस आहे. सोहेल खानचा जन्म 20 डिसेंबर 1970 रोजी मुंबईत झाला. सोहेल हा बॉलिवूडचे प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांचा मुलगा असून तो सलमान खानचा भाऊ आहे. सोहेलने 1997 मध्ये 'औजार' चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात संजय कपूर, सलमान खान आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर सोहेलने 1998 मध्ये आलेल्या 'प्यार किया तो डरना क्या' या यशस्वी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाचा तो निर्माताही होता. या चित्रपटात सलमान खान, अरबाज खान, काजोल आणि धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते. यानंतर सोहेलने 2002 मध्ये आलेल्या 'मैंने दिल तुझको दिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची सुरुवात केली. 2005 मध्ये आलेला 'मैने प्यार क्यूं किया' हा सोहेल खानचा पहिला हिट चित्रपट होता.

1988: मतदानाचे वय 21 वरून 18 पर्यंत कमी करण्याचे विधेयक मंजूर

1984 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना पंतप्रधान करण्यात आले. राजीव गांधी यांचा कार्यकाळ अनेक महत्त्वाच्या निर्णयांसाठी लक्षात ठेवला जातो. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे 18 वर्षांच्या तरुणांना मतदानाचा अधिकार देण्याचा. 20 डिसेंबर 1988 रोजी मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यासाठी संसदेत कायदा मंजूर करण्यात आला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget