एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 2 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 2 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

राजू श्रीवास्तव यांना पुन्हा 100 डिग्री ताप; पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करून जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. मात्र, त्यांच्या स्थितीत चढ-उतार कायम आहेत. नुकतेच त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. मात्र, पुन्हा ताप आल्याने राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले आहे.   

निपुण आणि वैदैहीची रोमॅंटिक केमिस्ट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘एक दोन तीन चार’ या नवीन चित्रपटाची घोषणा

मराठी मनोरंजनविश्वात दिमाखात पाऊल टाकत एकाहून एक दर्जेदार चित्रपट घेऊन जिओ स्टुडिओज (Jio Studio) आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’ (Ek Don Tin Char)  या आगामी चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली असून नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण जोडी म्हणजेच अभिनेता निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.    

‘घे डबल’चा धम्माल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

येत्या 30 सप्टेंबरपासून सर्वत्र डब्बल कॉमेडीची हवा होणार आहे, कारण निमित्त आहेम अभिनेते भाऊ कदम (Bhau Kadam)  आणि भूषण पाटील  (Bhushan Patil)  यांची दुहेरी भूमिका असणाऱ्या ‘घे डबल’ या चित्रपटाचं. जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ चित्रपटाचे भन्नाट टीझर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. पोस्टरवरील भाऊ आणि भूषण यांच्या डबल रोलविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. आज याच चित्रपटाचा टीझर सगळ्यांच्या भेटीला आला आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेच्या कथानकानं आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता  श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका मायरा वायकुळने (Mayra Vaikul) साकारली आहे. या सर्व कलाकारांनी मालिकेतील अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

जबरदस्त अॅक्शन अन् बिग बींचा खास लूक; ब्रह्मास्त्रचा नवा टीझर रिलीज

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ब्रह्मास्त्र (Brahmāstra) हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अभिनेता नागार्जुन (Nagarjuna), अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  या चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. चित्रपटाच्या ट्रेलरला गाण्यांना आणि टीझरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा नवा टीझर रिलीज झाला आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाचा निर्माता करण जोहर यानं हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

22:41 PM (IST)  •  02 Sep 2022

Karthikeya 2 : 'कार्तिकेय 2'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट

Karthikeya 2 Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार निखिल सिद्धार्थचा (Nikhil Siddhartha) 'कार्तिकेय 2' (Karthikeya 2) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या तीन आठवड्यानंतरदेखील हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. 'कार्तिकेय 2' हा या वर्षातला सुपरहिट दाक्षिणात्य सिनेमा ठरला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

21:38 PM (IST)  •  02 Sep 2022

लॉरेंस बिश्नोई गॅंगची सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पुन्हा धमकी

Sidhu Moose Wala : दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) वडीलांना पुन्हा एकदा लॉरेंस बिश्नोई या गॅंगने ई-मेलद्वारे धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना मेल करत शांत राहण्याची धमकी दिली आहे. नाहीतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

21:38 PM (IST)  •  02 Sep 2022

Jakkal : पुण्यात घडलेल्या भीषण हत्याकांडावर आधारित मराठी वेब-सिरीज 'जक्कल'

Jakkal : जिओ स्टुडिओज लवकरच 'जक्कल' (Jakkal) नावाची मराठी वेबसीरिज घेऊन येत आहेत. 1970 च्या दशकात पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडावर आधारित हा वेब शोअसून सामान्य मध्यमवर्गातील मुलं कळत नकळतपणे जेव्हा गन्हेगारीच्या मार्गावर वळतात आणि ते कोणत्या टोकाला जाऊ शकतात याचा शोध घेणारी ही मालिका असणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jio Marathi (@jiostudiosmarathi)

18:55 PM (IST)  •  02 Sep 2022

National Cinema Day : 'राष्ट्रीय चित्रपटदिनी' सिनेमे पाहा फक्त 75 रुपयांत

National Cinema Day : सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 16 सप्टेंबर हा दिवस देशभरात 'राष्ट्रीय चित्रपट दिवस' (National Cinema Day) म्हणून साजरा केला होता. यंदा यादिवशी देशभरात विविध ठिकाणी 4000 स्क्रीन्सवर 75 रुपयांत सिनेमा दाखवण्यात येणार आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) यासंदर्भात घोषणा केली आहे.

17:26 PM (IST)  •  02 Sep 2022

Roop Nagar Ke Cheetey : 'रूप नगर के चीते'चा ट्रेलर रिलीज

Roop Nagar Ke Cheetey : 'रूप नगर के चीते' (Roop Nagar Ke Cheetey) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट 'रूप नगर के चीते' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget