एक्स्प्लोर

Bollywood News Live Updates 19 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

LIVE

Key Events
Bollywood News Live Updates 19 May:  टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

लोकल ते ग्लोबल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे पहिले लोककलाकार ठरले राजस्थानचे मामे खान

annes Film Festival 2022: जगातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मानला जाणारा ‘कान्स चित्रपट महोत्सव 2022’ (Cannes Film Festival 2022) नुकताच सुरू झाला आहे. या सोहळ्याशी संबंधित अनेक फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. परदेशी सेलिब्रिटींसोबतच भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटीही यात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. यंदाचा ‘कान्स’ महोत्सव भारतासाठी खूप खास आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा यंदा ‘कान्स ज्युरी सदस्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. दीपिकासह अनेक बॉलिवूड कलाकार देखील या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. मात्र, या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच एक भारतीय लोककलाकार देखील अवतरला आहे. राजस्थानी गायक मामे खान (Mame Khan) यांनीही कान्सच्या रेड कार्पेटवर त्यांची जादू दाखवली आहे. अशा प्रकार कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे ते पहिलेच लोककलाकार ठरले आहेत. कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊन त्यांनी एक नाव इतिहास रचला आहे.

दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’

Panchayat Season 2 : अॅमेझॉन प्राईमच्या ‘पंचायत’ (Panchayat Season 2) या वेब सीरीजचा दुसरा सीझन 20 मे रोजी रिलीज होणार होता. मात्र, निर्मात्यांनी तो दोन दिवसांपूर्वीच रिलीज केला आहे. पंचायत 2’ ही वेब सीरीज Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसरा सीझन अनेक सोशल मीडिया साईट्स आणि टेलिग्रामवर लीक झाला होता. त्यानंतर निर्मात्यांनी वेब सीरीज लवकर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 'पंचायत' सीरीजमधील मुख्य अभिनेता जितेंद्र कुमारने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. अभिनेता जितेंद्र कुमार याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने वेब सीरीजच्या रिलीजची माहिती दिली आहे. अभिनेत्याच्या घरात असलेल्या टीव्ही स्क्रीनवर 'पंचायत 2' सुरू असल्याचे या फोटोत दिसत आहे. टीव्ही स्क्रीनवर वेब सीरीजचे नाव मोठ्या अक्षरात दिसत आहे. सोबत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये देखील सीरीज रिलीज केल्याचे म्हटले आहे.

17:18 PM (IST)  •  19 May 2022

 ‘प्रवाह पिक्चर' प्रेक्षकांच्या भेटीला; दर रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार सिनेमांचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

 ‘प्रवाह पिक्चर' प्रेक्षकांच्या भेटीला; दर रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार सिनेमांचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

वाचा संपूर्ण बातमी एका क्लिकवर

12:43 PM (IST)  •  19 May 2022

एकीकडे घंटानाद तर दुसरीकडे साखळी उपोषण; बालगंधर्व रंगमंदिर, जयप्रभा स्टुडिओसाठी कलावंत रस्त्यावर

एकीकडे घंटानाद तर दुसरीकडे साखळी उपोषण; बालगंधर्व रंगमंदिर, जयप्रभा स्टुडिओसाठी कलावंत रस्त्यावर

काही दिवसांपूर्वी पुण्यामधील (Pune) बालगंधर्व रंगमंदिराच्या (Bal Gandharva Ranga Mandir) पुनर्विकासाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पुनर्विकासाचं काम सुरू झाल्यानंतर काही काळ या रंगमंदिरामध्ये तिसरी घंटा वाजणार नाही. त्यामुळे  बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कला सादर करणारे कलावंत हे आता रस्त्यावर उतरले आहेत. तसेच कोल्हापूरातील (Kolhapur) जयप्रभा स्टुडिओ (Jayprabha Studio)  वाचवण्यासाठी देखील तेथील काही कलाकार साखळी उपोषण करत आहेत. 

वाचा संपूर्ण बातमी एका क्लिकवर

12:39 PM (IST)  •  19 May 2022

महात्मा गांधींच्या आयुष्यावर वेब सीरीज, अभिनेता प्रतिक गांधी साकारणार मुख्य भूमिका!

आदित्य बिर्ला ग्रुपचे व्हेंचर अॅप्लाज एंटरटेनमेंटने 'गांधी' यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक सीरीजची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित ही वेब सीरीज प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी बिफोर इंडिया' आणि 'गांधी-द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड' या दोन पुस्तकांवर आधारित असणार आहे. महात्मा गांधी हे एक महान नेते होते, शांततेचे प्रतीक आणि मानवतेचा चमत्कार होते. त्यांनी आपल्या असामान्य कार्यांनी भारतीय इतिहासाची दिशाच बदलली आणि जगभरातील पिढ्यांवर याचा प्रभाव टाकला. त्याचं हेच व्यक्तिमत्त्व या सीरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे. ‘स्कॅम 1992’ फेम अभिनेता प्रतीक गांधी या सीरीजमध्ये महात्मा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. याआधी ‘स्कॅम 1992’मध्ये प्रतिकने साकारलेली ‘हर्षद मेहता’ ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती.

वाचा संपूर्ण बातमी एका क्लिकवर

10:15 AM (IST)  •  19 May 2022

Bhagyashree Mote :  अभिनेत्री भाग्यश्री मोटेला 75 हजाराचा सायबर फटका

Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटेला 75 हजाराचा सायबर फटका; आंबोली पोलिसांनी केला गुन्हा दाखल

वाचा संपूर्ण बातमी एका क्लिकवर...

10:10 AM (IST)  •  19 May 2022

सायफाय 'अजूनी'तून उलगडणार एलियनची गोष्ट, ‘या’ दिवशी येणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी मनोरंजन विश्वातही सध्या सायफाय कथानक असलेल्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. प्रेक्षकांना देखील या कथा आवडत आहेत. प्रेक्षकांची हीच आवड लक्षात घेता आगामी सायफाय कथानक असलेला चित्रपट म्हणून साकार राऊत दिग्दर्शित ‘अजूनी’ (Ajuni) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अतिशय उत्कंठावर्धक अशा या चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं असून, हा चित्रपट 8 जुलैला प्रदर्शित केला जाणार आहे.

वाचा संपूर्ण बातमी एका क्लिकवर...

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget