एक्स्प्लोर

Web Series on Mahatma Gandhi : महात्मा गांधींच्या आयुष्यावर वेब सीरीज, अभिनेता प्रतिक गांधी साकारणार मुख्य भूमिका!

Web Series on Mahatma Gandhi : ‘स्कॅम 1992’ फेम अभिनेता प्रतीक गांधी या सीरीजमध्ये महात्मा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.

Web Series on Mahatma Gandhi : आदित्य बिर्ला ग्रुपचे व्हेंचर अॅप्लाज एंटरटेनमेंटने 'गांधी' यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक सीरीजची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित ही वेब सीरीज प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी बिफोर इंडिया' आणि 'गांधी-द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड' या दोन पुस्तकांवर आधारित असणार आहे. महात्मा गांधी हे एक महान नेते होते, शांततेचे प्रतीक आणि मानवतेचा चमत्कार होते. त्यांनी आपल्या असामान्य कार्यांनी भारतीय इतिहासाची दिशाच बदलली आणि जगभरातील पिढ्यांवर याचा प्रभाव टाकला. त्याचं हेच व्यक्तिमत्त्व या सीरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे.

‘स्कॅम 1992’ फेम अभिनेता प्रतीक गांधी या सीरीजमध्ये महात्मा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. याआधी ‘स्कॅम 1992’मध्ये प्रतिकने साकारलेली ‘हर्षद मेहता’ ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास पडद्यावर दिसणार!

अॅप्लॉज एंटरटेनमेंटचे सीईओ समीर नायर या सीरीजबद्दल बोलताना म्हणाले की, ‘रामचंद्र गुहा हे एक इतिहासकार आणि उत्कृष्ट कथा लेखक आहेत. त्यांची गाजलेली पुस्तके ‘गांधी बिफोर इंडिया’, आणि ‘गांधी– द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड’ सीरीज स्वरुपात साकारायला मिळाल्याचा पडद्यावर मिळाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.’

या सीरीजमध्ये महात्मा गांधींची भूमिका साकारण्यासाठी प्रतिक गांधीशिवाय दुसऱ्या कोट्याच अभिनेत्याचा विचार आमच्या मनात आला नाही, असे ते म्हणाले. महात्मा गांधी आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास अंतर्भूत अलेल्या या सीरीजला आणि पात्राला प्रतिकच खरा न्याय देऊ शकेल. जगभरातील प्रेक्षकांना या माध्यमातून आधुनिक भारताच्या जन्माची कहाणी दिसणार असल्याचे ते म्हणाले.

त्यांच्या शिकवणींचे नैतिक सार जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाईल!

प्रख्यात इतिहासकार आणि चरित्रकार रामचंद्र गुहा यांनी या सीरीजबद्दल बोलताना म्हटले की, ‘गांधींच्या कार्याने संपूर्ण जगात बदल घडवून आणला आणि त्यांचा वारसा देशभरातील लोक जपत आहेत. त्यांनी स्वातंत्र्य, आंतरधर्मीय सलोखा आणि वंचितांच्या हक्कांसाठी निस्वार्थपणे लढा दिला होता. दरम्यान, त्यांनी अनेक मित्र आणि शत्रूही बनवले. माझी गांधींवरील पुस्तके आता अशा प्रकारे लोकांच्या भेटीला येणार आहेत, याचा मला खूप आनंद आहे.  मला खात्री आहे की, गांधींच्या जीवनाची गुंतागुंतीची रूपरेषा आणि त्यांच्या शिकवणींचे नैतिक सार जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाईल.’

हेही वाचा :

Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’

Cannes Film Festival 2022: लोकल ते ग्लोबल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे पहिले लोककलाकार ठरले राजस्थानचे मामे खान

Happy Birthday Nawazuddin Siddiqui : कधीकाळी वॉचमनचे काम केले, दारोदारी मसाले विकले! आता बॉलिवूडवर राज्य करतोय नवाजुद्दीन सिद्दीकी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget