Entertainment News Live Updates 18 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
‘ऑस्कर’ विजेत्या विल स्मिथवर ‘या’ कार्यक्रमाने घातली बंदी!
हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याने अभिनेता ख्रिस रॉक याला मारलेली थप्पड आता त्यालाच महागात पडत आहे. ‘ऑस्कर’ सोहळ्यात घडलेल्या या प्रकाराला आता अनेक महिने उमटले असले, तरी या प्रकरणाचे पडसाद आजही उमटताना पाहायला मिळतायत. याच प्रकरणामुळे एका कार्यक्रमातून अभिनेता विल स्मिथची हकालपट्टी करण्यात आली आहे. ‘SNL’ने विल स्मिथवर कायम स्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
'ती मी नव्हेच' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'ती मी नव्हेच' या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रेयस तळपदे, उर्मिला मातोंडकर आणि निनाद कामत महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. 'ती मी नव्हेच' या सिनेमानं आता सिनेसरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
किच्चा सुदीपच्या 'कब्जा'चा ट्रेलर आऊट
दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीपच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या किच्चा सुदीप त्याच्या आगामी 'कब्जा' सिनेमामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या सिनेमात किच्चा सुदीपसह उपेंद्रदेखील मुख्य भूमिकेत आहे.
चंद्रपूरमध्ये 'झाडीपट्टी' नाट्य संमेलनाला सुरुवात
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात आजपासून चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन सुरू झाले आहे. विदर्भातील चार जिल्ह्यातल्या झाडीपट्टी नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी झाडीपट्टी नाट्य संमेलन आयोजित केले जाते. यंदा प्रसिद्ध झाडीपट्टी कलाकार अनिरुद्ध वनकर संमेलनाध्यक्ष आहेत.
'नेने वस्थुन्ना'मध्ये धनुष दिसणार दुहेरी भूमिकेत
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या आगामी 'नेने वस्थुन्ना' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. सेल्वाराघवनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात धनुष दुहेरी भूमिकेत दिसून येणार आहे.
Nishi Singh Passed Away : अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन
Nishi Singh Passed Away : मनोरंजनसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. 'कुबूल है', 'तेनाली राज', 'इश्कबाज' यांसारख्या लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री निशी सिंह (Nishi Singh) यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निशी सिंह आजारी होत्या. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडीसला दिल्ली पोलिसांकडून पुन्हा समन्स
Jacqueline Fernandez Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता ईडीकडून जॅकलीनला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला (उद्या) जॅकलीनला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर
Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
Prajakt Deshmukh : 'वाट दिसु दे गा'; असं म्हणत लेखक प्राजक्त देशमुख यांनी व्यक्त केला संताप
Prajakt Deshmukh : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुखला (Prajakt Deshmukh) अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'संगीत देवबाभळी' या नाटकाच्या 350 प्रयोगानिमित्त प्राजक्त नाशिकहून मुंबईत येत असताना खड्ड्यांमुळे त्याला प्रचंड मनस्ताप झाला आहे. ट्वीट करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
वाट दिसु दे गा
— Prajakt Deshmukh | प्राजक्त देशमुख (@Prajaktdeshmukh) September 18, 2022
नाशिक - मुंबई https://t.co/NSUaBoztD4 pic.twitter.com/D5XjvZUE4T
यो यो हनी सिंह करणार जोरदार कमबॅक
रॅपर यो यो हनी सिंह गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या खाजगी कारणांमुळे मीडियापासून दूर आहे.अनेकांनी हनी सिंहची कारकीर्द संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्यासाठी हनी सिंह पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार आहे.पंजाबी गायक हनी सिंहने हनी 3.0 अल्बमची घोषणा करत आपल्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. लवकरच या अल्बमची गाणीही रिलीज होणार आहेत.