Entertainment News Live Updates 18 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
पाकिस्तानची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका 'जॉयलँड' वरील बंदी मागे; पाकिस्तानी प्रेक्षकांना पाहता येणार चित्रपट
पाकिस्तानमधील (Pakistan) अधिकाऱ्यांनी चित्रपट निर्माता सॅम सादिक (Saim Sadiq) यांच्या 'जॉयलँड' (Joyland) चित्रपटावरील बंदी हटवली आहे. आता हा चित्रपट शुक्रवारी (18 नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. सॅम सादिक यांनी 4 नोव्हेंबरला 'जॉयलँड' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. त्यानंतर या सिनेमावर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली. पण आता ही बंदी हटवण्यात आली आहे.
'इंडिया लॉकडाऊन' चा ट्रेलर रिलीज
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांच्या 'इंडिया लॉकडाउन' (India Lockdown) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान अस्थाव्यस्थ झालेलं जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती, यासंदर्भातील वास्तव हे 'इंडिया लॉकडाउन' या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'जेता' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
असंख्य संकटांवर मात करत अनेक वादळांना कवेत घेत प्रचंड जिद्दीच्या बळावर विजयी होणाऱ्या विजेत्याची कहाणी सांगणारा 'जेता' (Jeta) हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'जेता'चा उत्साहवर्धक ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 25 नोव्हेंबर रोजी 'जेता' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर राम गोपाल वर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, "तिच्या आत्म्यानं परत यावं अन् त्याचे 70 तुकडे करावेत..."
राम गोपाल वर्मानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'केवळ कायद्याच्या भीतीने क्रूर हत्या रोखता येत नाहीत. पण त्या घटनेचा बळी ठरलेल्या व्यक्तीच्या आत्म्यानं परत येऊन मारेकऱ्यांना मारले तर ते नक्कीच हे थांबवता येईल. देवाने याचा विचार करावा आणि आवश्यक ते करावे ही विनंती. तिच्या आत्म्याला शांती मिळण्याऐवजी परत यावे आणि त्याचे 70 तुकडे करावे' राम गोपाल वर्माच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.'
Ram Charan : राम चरणने आगामी सिनेमाच्या तयारीला केली सुरुवात
Ram Charan : राम चरणने आता त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
Goshta Eka Paithanichi : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'गोष्ट एका पैठणीची'चा ट्रेलर आऊट
Goshta Eka Paithanichi : 'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 68 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा मान मिळाला आहे. आता सामान्य स्वप्नांचा असामान्य प्रवास उलगडणाऱ्या 'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
View this post on Instagram
Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर भाष्य न करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर अशोक पंडितने साधला निशाणा
Ashoke Pandit On Shraddha Walkar : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण (Shraddha Murder Case) सध्या देशभरात चर्चेत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताबनं तिची गळा दाबून हत्या केली. त्या मृतदेहाचे त्याने 35 तुकडे केले आणि त्यांची टप्प्याटप्प्याने विल्हेवाट लावायला सुरुवात केली. या प्रकरणावर देशातील नागरिकांसह बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान सिने-दिग्दर्शक अशोक पंडितने (Ashoke Pandit) श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया न देणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.
Itna Sannata kyoon hai bhai ?
— Ashoke Pandit (@ashokepandit) November 14, 2022
Does the gruesome killing of #shraddhawalker by #AasifPoonawala matter to you ? #HangAasifPoonawala #LoveJihad. pic.twitter.com/L5ZeNJJj22
Drishyam 2 Movie Review : क्लायमेक्स अन् सस्पेन्सने सजलेला 'दृश्यम 2'
Drishyam 2 Movie Review : 'दृश्यम' (Drishyam 2) या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लगेचच चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करू लागले. त्यामुळे निर्मात्यांनी या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मुळात या सिनेमाच्या यशाचं श्रेय या सिनेमाच्या कथेला जातं.
Drishyam 2 Movie Review : क्लायमेक्स अन् सस्पेन्सने सजलेला 'दृश्यम 2'
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता...' फेम चंपक चाचांना सेटवर दुखापत
Amit Bhatt in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या या मालिकेतील 'चंपक चाचा' म्हणजेच 'बापूजी' अर्थात अमित भट्ट (Amit Bhatt) यांना मालिकेच्या सेटवर दुखापत झाली आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: Amit Bhatt aka Champak Chacha gets severely injured on sets; here's what happened
— Bollywood Life (@bollywood_life) November 18, 2022
#AmitBhatt #ChampakChacha #TAARAKMEHTAKAOOLTAHCHASHMAH #TaarakMehtaKaOoltahChashmahActorInjured
https://t.co/L4IdEPTY41