Entertainment News Live Updates 18 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
![Entertainment News Live Updates 18 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर! Entertainment News Live Updates 18 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Kota Factory 3: जीतू भैय्या इज बॅक! कोटा फॅक्ट्री-3 येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Kota Factory 3: अभिनेता जितेंद्र कुमारच्या (Jitendra Kumar) कोटा फॅक्ट्री या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजच्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. कोटा फॅक्ट्री-3 ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कोटा फॅक्ट्री-3 (Kota Factory 3) सीरिजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Subodh Bhave: सुबोध भावे साकारणार संत तुकाराम महाराजांची भूमिका
Subodh Bhave: अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याची 'ताज' ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली. आता "संत तुकाराम" या आगामी हिंदी चित्रपटात अभिनेता सुबोध भावे हा "तुकाराम महाराज" यांची भूमिका साकरणार आहे. नुकताच सुबोधनं त्याचा "संत तुकाराम" (Sant Tukaram) या चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो "तुकाराम महाराज" यांच्या भूमिकेत दिसत आहे. हा फोटो शेअर करुन सुबोधनं त्याच्या "संत तुकाराम" या हिंदी चित्रपटाची माहिती दिली.
Khyali Saharan: स्टँड-अप कॉमेडिन ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप
Khyali Saharan : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन ख्याली सहारनवर (Khyali Saharan) बलात्कार केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच आला आहे. जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप कॉमेडियन ख्यालीवर करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत गुरुवारी (16 मार्च) पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या तक्रारीच्या आधारे मंगळवारी (14 मार्च) मानसरोवर पोलीस ठाण्यात ख्याली सहारनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रेट इंडियन चॅलेंज सीजन 2 मध्ये ख्यालीने सहभाग घेतला होता. या सीझनचा विजेता रौफ लाल हा ठरला होता. ‘द कपिल शर्मा शो’या शोमध्ये देखील ख्यालीने हजेरी लावली होती. ख्याली हा सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो. त्याला 70.4K एवढे नेटकरी इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.
Sara Ali Khan : 'गॅसलाइट' पाठोपाठ सारा अली खान झळकणार 'या' बिग बजेट सिनेमात
Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या सिनेमांसह सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. लवकरच तिचा 'गॅसलाइट' (Gaslight) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 31 मार्चला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमा पाठोपाठ सारा आणखी एका बिग बजेट सिनेमात झळकणार आहे. सारा लवकरच 'गुंजन सक्सेना'चा दिग्दर्शक शरण शर्माच्या आगामी सिनेमात दिसणार आहे.
View this post on Instagram
Karan Gunhyala Mafi Nahi : अश्विनी कासार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
Karan Gunhyala Mafi Nahi : नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री अश्विनी कासार (Ashwini Kasar) आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ (Karan Gunhyala Mafi Nahi) या नव्या मालिकेत अश्विनी कासार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.
View this post on Instagram
Mrs Chatterjee VS Norway : राणी मुखर्जीचा 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला;
Mrs Chatterjee Vs Norway Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीची (Rani Mukerji) मु्ख्य भूमिका असलेला 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' (Mrs Chatterjee Vs Norway) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे.
View this post on Instagram
MC Stan : 'बिग बॉस' फेम एमसी स्टॅनचा लाईव्ह शो पाडला बंद
MC Stan : 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) विजेता एमसी स्टॅनच्या (MC Stan) लाईव्ह कॉन्सर्टचे देशभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनने 'इंडिया टूर'चं आयोजन केलं आहे. त्याअंतर्गत तो देशभरातील विविध शहरांमध्ये जाऊन आपल्या रॅप शोचं आयोजन करत आहे. अशातच आता रॅपरच्या इंदूरमधील लाईव्ह शो दरम्यान बजरंग दलाकडून मारहाण करत त्याला धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
Wo Bajrang dal k aadmi stage tak kaise gaya..? Kisi security ne rokne ki koshish nahi kiya kya? Don hain kya wo bajrang dal k C indore ka, usse dekhke sab dargaya? Indore k police jaise nikammo kisi kaam nahi hain .
— Kumar Waiba (@KattarPratik) March 18, 2023
PUBLIC STANDS WITH MC STAN
Ram Charan : ऑस्करनंतर राम चरणची मोठी झेप; हॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार!
Ram Charan Hollywood Debut : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या ऑस्करमुळे (Oscars 2023) चर्चेत आहे. राम चरणच्या ब्लॉकबस्टर 'आरआरआर' (RRR) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. सिनेविश्वातील मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातदेखील या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याने बाजी मारली आहे. आता राम चरण भारतात परतला असून नुकत्याच एका मुलाखतीत त्याने हॉलिवूडच्या (Hollywood) सिनेमात काम करण्याबद्दल भाष्य केलं आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)