Entertainment News Live Updates 18 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
मिका सिंहचे जोधपूरमध्ये होणार स्वयंवर; 19 जूनपासून कार्यक्रमाला सुरुवात
Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंह (Mika Singh) हा लोकप्रिय गायक असून त्याची अनेक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मिका सिंहचा 'स्वयंवर मीका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) या कार्यक्रम गेल्या महिन्यापासून चर्चेत होता. आता 19 जूनपासून प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. मिकाचे चाहतेदेखील या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत.
मिका सिंह 'स्वयंवर मीका दी वोटी' या कार्यक्रमासाठी उत्सुक आहे. मिका सिंहचे स्वयंवर जोधपूरमध्ये होणार आहे. मिका सिंहचे स्वयंवर थाटामाटात होणार आहे. सोशल मीडियावर मिका सिंहच्या स्वयंवराचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 14 मे रोजी मिका सिंहचा खास मित्र कपिल शर्मादेखील मिका सिंहच्या स्वयंवरासाठी जोधपूरला गेला होता. लवकरच मिका सिंहच्या बॅचलर्स पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे.
'स्वयंवर मीका दी वोटी' हा कार्यक्रम 19 जूनपासून स्टार भारतवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मिकाला जोडीदार शोधण्यासाठी अनेक सेलिब्रिटी मदत करताना दिसणार आहेत. मीकाचे 'मीका दी वोटी' हे गाणं सध्या चर्चेत आहे. या गाण्याचे बोल मिकाने लिहिले असून संगीतबद्धदेखील मिकानेच केलं आहे. मिकाचे ग्रॅंड स्वयंवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची प्रेयसी म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे.
सरसेनापतींचा हाऊसफुल्ल चौथ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश
Sarsenapati Hambirrao : प्रविण तरडेंचा (Pravin Tarde) 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना टक्कर दिली आहे. आता या सिनेमाने चौथ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅठफॉर्मवर प्रदर्शित होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती दबडेने केली आयुष्यातली पहिली कमाई; रंगला ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ!
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. बदलापूरच्या भारती दबडे यांनी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर आयुष्यातली पहिली कमाई केली आहे. ज्ञानाच्या साथीनं सर्वकाही शक्य आहे हे त्यांनी त्यांच्या खेळातून प्रेक्षकांना दाखवून दिलं आहे.
Boman Irani : बोमन ईरानी करणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण; 17 जूनला प्रदर्शित होणार 'मासूम'
बॉलिवूड अभिनेता बोमन ईरानी (Boman Irani) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. बोमन ईरानीची 'मासूम' (Masoom) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 जूनला ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
Nishikant Kamat यांच्या आठवणीत पार पडला 'Ruiank'नाट्यमहोत्सव; सेलिब्रिटींची हजेरी
महाविद्यालयीन नाट्यप्रेमी विद्यार्थ्यांसाठी रंगभूमी म्हणजे एकांकिका स्पर्धा. कोरोना महामारीमुळे एकांकिका स्पर्धा झाल्या नाहीत. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने एकांकिका स्पर्धा होऊ लागल्या आहेत. नुकताच रुईया महाविद्यालयाचा 'रुईयांक' (Ruiank) हा नाट्यमहोत्सव पार पडला. या महोत्सवाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
राजकुमार रावच्या 'हिट'चा टीझर आऊट; 15 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राजकुमारचा 'हिट- द फर्स्ट केस' (HIT The First Case) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. हा रहस्यमय टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे. या सिनेमात राजकुमारसोबत सान्य मल्होत्रादेखील (Sanya Malhotra) दिसणार आहे.