Entertainment News Live Updates 16 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Jun 2022 05:52 PM
'टकाटक 2' येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

Takatak 2 : ' टकाटक'ला मिळालेल्या यशाच्या बळावर प्रेक्षकांचं दुप्पट मनोरंजन करण्याच्या उद्देशानं बनवण्यात आलेला सिक्वेल म्हणजेच 'टकाटक २' या चित्रपटाबाबत सर्वांच्याच मनात कुतूहल आहे. 'टकाटक २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार तरी कधी? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. 19 ऑगस्ट 2022 रोजी 'टकाटक 2' संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.


वाचा सविस्तर बातमी

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’ 1 जुलैला होणार प्रदर्शित; अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले साकारणार प्रमुख भूमिका

Dear Malley : सध्या मराठी चित्रपटांच्या यादीत अनेक दमदार चित्रपटांचा समावेश होत असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डिअर मॅाली’ (Dear Malley) चाही यात समावेश होत आहे. ज्यांनी अनेक नावाजलेले चित्रपट सिनेमासृष्टीला दिले आहेत. येत्या १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकतेच ‘डिअर मॅाली’चे पोस्टर समोर आले असून यात गुरबानी गिल, अलोक राजवाडे (Alok Rajwade), मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॅायसेन, क्रिस्टर होल्मग्रेन मुख्य भूमिकेत आहेत. 


वाचा सविस्तर बातमी 

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’ 1 जुलैला होणार प्रदर्शित; अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले साकारणार प्रमुख भूमिका

Dear Malley : सध्या मराठी चित्रपटांच्या यादीत अनेक दमदार चित्रपटांचा समावेश होत असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डिअर मॅाली’ (Dear Malley) चाही यात समावेश होत आहे. ज्यांनी अनेक नावाजलेले चित्रपट सिनेमासृष्टीला दिले आहेत. येत्या १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकतेच ‘डिअर मॅाली’चे पोस्टर समोर आले असून यात गुरबानी गिल, अलोक राजवाडे (Alok Rajwade), मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॅायसेन, क्रिस्टर होल्मग्रेन मुख्य भूमिकेत आहेत. 


वाचा सविस्तर बातमी 

खतरों के खिलाडीमधील टास्क दरम्यान कनिकाला झाली दुखापत

Kanika Mann Injured : लवकरच  खतरों के खिलाडी 12 (Khatron Ke Khiladi 12) हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक  रोहित शेट्टी (Rohit Shetty) करतो. अनेक सेलिब्रिटी खतरों के खिलाडी या शोमध्ये सहभाग घेऊन वेगवेगळे स्टंट करतात.  खतरों के खिलाडी 12 मध्ये कनिका मान ही अभिनेत्री सहभागी होणार आहे. तिला स्टंट करताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अफ्रीकेमधील केप टाउनमध्ये सध्या खतरों के खिलाडी 12 चे शूटिंग सुरु आहे. कनिकाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कनिकाच्या शरीरावर जखमा झालेल्या दिसत आहेत. 


वाचा सविस्तर बातमी 

भारत गणेशपुरे आणि सागर कारंडेची 'चला हवा येऊ द्या' मधून एक्झिट?

Sagar Karande,  Bharat Ganeshpure : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांच्या आणि मालिकांच्या प्रमोशनसाठी हजेरी लावतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. निलेश साबळे (Nilesh Sable) हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कुशल बद्रिके (Kushal Badrike), श्रेया बुगडे (Shreya Bugade),भारत गणेशपुरे  (Bharat Ganeshpure) आणि सागर कारंडे ( Sagar Karande) हे या कलाकार  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधील त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पण दोन कलाकार लवकरच या शोमधून एक्झिट घेणार आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

अभिनेत्री केतकी चितळेने ठोठावले मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे

Ketaki Chitale : आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने आता मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत अभिनेत्रीने ठाणे पोलिसांकडून झालेली आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिला 15 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले होते.


ठाणे पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केल्याचा दावा करत, अभिनेत्री केतकी चितळे हिने मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे.

Mika Di Vohti : स्वयंवराआधीच मिका भावूक; कपिल म्हणाला, 'याची लाईफ पार्टनर...'

पाहा व्हिडीओ


लेकीबाबत केलेल्या पोस्टबद्दल निक जोनास म्हणतो, 'हा प्रवास लोकांसमोर यावा असं वाटलं!'

Priyanka Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाचा चाहता वर्ग मोठा आहे.  प्रियांका आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) हे सेरोगसीद्वारे आई-बाबा झाले. निक आणि प्रियांकानं त्यांच्या लेकीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनास' असं ठेवलं. मुलीच्या जन्मानंतर प्रियांका आणि निकनं 100 दिवसांनंतर एक पोस्ट शेअर केली. मालती तिच्या जन्मानंतर 100 दिवस एनआयसीयूमध्ये होती. याबाबत प्रियांका आणि निकनं पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली होत. एका मुलाखतीमध्ये निक जोनासनं मुलीबाबत केलेल्या पोस्टबद्दल सांगितलं. 


वाचा सविस्तर बातमी 

साई पल्लवीचं वादग्रस्त विधान, काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची तुलना करताना म्हणाली...

Sai Pallavi : दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीच्या (Sai Pallavi) एका वक्तव्यावरून देशभरात वादळ उठले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंसा आणि धर्माच्या मुद्द्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘कश्मीर फाइल्स’चा संदर्भ देताना अभिनेत्री म्हणाली की, ‘या चित्रपटात काश्मिरी पंडितांची त्यावेळी हत्या कशी झाली, हे दाखवण्यात आले आहे. पण, त्यापलीकडे जाऊन हिंसेला धर्माशी जोडले, तर काही दिवसांपूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीलाही बेदम मारहाण करून जय श्री रामचा नारा देण्यास सांगितले. या दोन घटनांमध्ये काय फरक आहे?’


अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या आगामी 'विराट पर्वम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने काश्मिरी पंडितांबद्दल असे काही वक्तव्य केले की, त्यावरून वाद सुरू झाला आहे. साई पल्लवीने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रसंगांची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

मुंबई मेट्रोमध्ये कियारा अन् वरुणनं खाल्ला वडापाव; नेटकरी भडकले, म्हणाले...

Jug Jugg Jeeyo : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा  जुग जुग जियो (Jug Jugg Jeeyo)  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची टीम सध्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. मंगळवारी (14 जून) वरुण, कियारा आणि  अनिल कपूर (Anil Kapoor)  यांनी मुंबई मेट्रोमध्ये प्रवास केला. या दरम्यान कियारा आणि वरुणनं वडापाववर ताव मारला. कियारा आणि वरुणचा मेट्रोमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कियारा आणि वरुण हे वडापाव खात आहेत, असं दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी कियारा आणि वरुणला ट्रोल केलं आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

'... म्हणून कॉफी विथ करणमध्ये रणबीर सहभागी होणार नाही'; करण जोहरनं सांगितलं कारण

Coffee With Karan Season 7 : प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सहा सीझननं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता या कार्यक्रमाच्या सातव्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.  'कॉफी विथ करण 7'चा प्रिमिअर हा 7 जुलै रोजी होणार आहे. ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. पण अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा या शोमध्ये हजेरी लावणार नाही,असं करणनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं. 


वाचा सविस्तर बातमी

मिका सिंहला पाहताच मुलगी झाली ‘आऊट ऑफ कंट्रोल’, भर शोमध्येच केले किस!

Swayamvar Mika Di Vohti : बॉलिवूड गायक मिका सिंह (Mika Singh) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. स्टार भारतच्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. ‘मिका दी वोटी’ (Swayamvar Mika Di Vohti) हा शो 19 जूनपासून रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. या शोची घोषणा झाल्यापासून मिकाचे चाहते देखील उत्सुक झाले आहेत. मेकर्स देखील दररोज नवे प्रोमो रिलीज करून चाहत्यांची आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.


लवकरच 'स्वयंवर : मिका दी वोटी' हा रिअॅलिटी शो टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या स्वयंवरात देशभरातील अनेक भागांतील मुली मिका सिंहची वधू बनण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. नुकताच या शोचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी मिकाला चक्क कीस करताना दिसली आहे.


 


प्रेमाची वेगळी परिभाषा सांगणारा दिग्दर्शक! इम्तियाज अलीचे ‘हे’ चित्रपट पाहिलेयत का?

Happy Birthday Imtiaz Ali : बॉलिवूड इंडस्ट्रीला सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक, लेखक इम्तियाज अली (Imtiaz Ali) यांचा आज (16 जून) वाढदिवस आहे. इम्तियाज यांचा जन्म 16 जून 1971 रोजी जमशेदपूर, झारखंड येथे झाला. अभिनेता व्हायचं हे त्यांनी आधीच निश्चित केलं होतं. त्याच उद्देशाने त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाय ठेवला होता. पण, ते अभिनेत्याऐवजी दिग्दर्शक बनले. यानंतर त्यांनी बॉलिवूडला ‘जब वी मेट’ ते ‘तमाशा’ यांसारखे एकापेक्षा एक आयकॉनिक चित्रपट दिले.


इम्तियाज अली यांनी 2005 मध्ये 'सोचा ना था' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नाही. यानंतरही त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गडगडतच होते. मात्र, 2007 पासून इम्तियाज अली यांचे नशीब बदलले आणि बॉलिवूडला एक सुपरहिट चित्रपट मिळाला, ज्याने शाहिद आणि करिनाच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. हा चित्रपट होता ‘जब वी मेट’. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.


वाचा संपूर्ण बातमी

Happy Birthday Mithun Chakraborty : बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले मिथुन चक्रवर्ती!

Mithun Chakraborty Birthday : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आज (16 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. मिथुन चक्रवर्ती चित्रपट जगतात पाऊल ठेवण्यापूर्वी अभिनेत्री हेलन यांचे सहाय्यक होते. मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 साली 'मृगया' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.


मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनय, अॅक्शन आणि नृत्य या तिन्हींमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. त्यांनी बंगाली, हिंदी, ओरिया, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये 350हून अधिक चित्रपट केले आहेत. अभिनय आणि नृत्यामुळे चर्चेत असणारे मिथुन चक्रवर्ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होते.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'जल, वायु,अग्नी...'; अंगावर शहारे आणणारा ब्रह्मास्त्रचा ट्रेलर रिलीज


गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि  आलिया भट्ट यांचे चाहते ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट उत्सुकतेने पाहात होते. या चित्रपटचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. आलियानं या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आमच्या ह्रदयाचा भाग- ब्रह्मास्त्र. 09.09.2022 रोजी लवकरच भेटूयात. '


'स्वयंवर मीका दी वोटी' कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला


बॉलिवूड गायक मिका सिंह त्याच्या लग्नासाठी उत्सुक आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबिय, मित्र आणि चाहते आनंदी झाले आहेत. मिका सिंहचा 'स्वयंवर मीका दी वोटी' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमामुळे तरी मिकाला आयुष्याचा जोडीदार मिळेल अशी चाहत्यांकडून आशा व्यक्त केली जात आहे.


काळ्या-पिवळ्या टमटमऐवजी आता कार दिसणार!, ‘दे धक्का 2’चा भन्नाट टीझर पाहिलात का?


अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव यांच्या बहारदार विनोदाने सजलेल्या ‘दे धक्का’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. या चित्रपटाला आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत स्थान आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, कोरोनामुळे चित्रपटात खंड पडला होता. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘दे धक्का 2’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


बिग बॉस ते निवडणुकीच्या रणांगणात झळकणारा अभिजीत बिचुकलेची एन्ट्री किचन कल्लाकारच्या मंचावर, तृप्ती देसाईदेखील येणार


'किचन कल्लाकार' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात. पण 'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात अभिजित बिचुकले, तृप्ती देसाई आणि जयवंत वाडकर येणार आहेत.


‘बँड बाजा वरात’, आता सेलिब्रिटींचे लग्न होणार जोरात!


‘झी मराठी’वरील ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमाने अनेक नवं दाम्पत्यांना आहेर देऊन त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस अजून खास बनवला. आता या पर्वात प्रेक्षकांची लाडकी सेलिब्रिटी जोडपी सहभागी होणार आहेत. आपण नेहमी कलाकारांच्या लग्नाचा थाट फोटोज मधून पाहत आलो आहोत. पण, जर प्रत्यक्षात आपल्याला एका सेलिब्रिटी जोडप्याचं लग्न पाहायला मिळालं तर? हो.. आता हे शक्य आहे! नव्या ‘बँड बाजा वरात, सेलिब्रिटींच लग्न जोरात’ या कार्यक्रमामुळे हे शक्य होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.