एक्स्प्लोर

Happy Birthday Mithun Chakraborty : ‘डान्स असिस्टंट’ ते ‘डिस्को किंग’ प्रवास, बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले मिथुन चक्रवर्ती!

Mithun Chakraborty Birthday : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती आज (16 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहे.

Mithun Chakraborty Birthday : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आज (16 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. मिथुन चक्रवर्ती चित्रपट जगतात पाऊल ठेवण्यापूर्वी अभिनेत्री हेलन यांचे सहाय्यक होते. मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 साली 'मृगया' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनय, अॅक्शन आणि नृत्य या तिन्हींमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. त्यांनी बंगाली, हिंदी, ओरिया, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये 350हून अधिक चित्रपट केले आहेत. अभिनय आणि नृत्यामुळे चर्चेत असणारे मिथुन चक्रवर्ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होते.

श्रीदेवीच्या प्रेमात आकंठ बुडाले!

बॉलिवूडमध्ये अफेअर असणे आणि नंतर वेगळे होणे ही काही मोठी गोष्ट नाही.  अशी अनेक उदाहरणे बी-टाऊनमध्ये पाहायला मिळतील. असंच काही मिथुन चक्रवर्तींबाबतही घडलं होतं. मिथुन चक्रवर्ती यांची प्रेमकहाणी चित्रपट  'गुरू'पासून सुरु झाली. या दरम्यान मिथुन चक्रवर्ती श्रीदेवीच्या प्रेमात पडले होते. इतकंच नाही, तर दोघांनी गुपचूप लग्नही केल्याच्या बातम्या आल्या होत्या. डान्सर-अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि श्री देवी एकमेकांच्या खूप जवळ आले होते. मिथुन यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन त्यांच्याशी लग्न करावे, अशी श्रीदेवींची इच्छा होती. या दम्यान दोघांनी मंदिरात लपून लग्न केल्याचेही बोलले जात होते.

…म्हणून श्रीदेवी-मिथुन झाले वेगळे!

मिथुन चक्रवर्ती यांना देखील श्रीदेवीशी लग्न करायचे होते. श्रीदेवीचेही त्यांच्यावर प्रेम होते, पण तिने लग्नासाठी अट ठेवली होती. मिथुन यांनी त्यांची पत्नी योगिता बाली यांना आधी घटस्फोट द्यावा अशी तिची इच्छा होती. तरच, ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर मिथुन यांनी योगितावर घटस्फोटासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि त्यामुळेच योगिता यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर मिथुन चक्रवर्ती कोलमडून गेले.

योगिता यांच्या या कठोर पावलानंतर मिथुन आणि श्रीदेवी यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि बघता बघता ही प्रेमकहाणी संपली. त्यानंतर श्रीदेवीने 8 वर्षांनी मोठ्या बोनी कपूरसोबत लग्न केले.

हेही वाचा :

Suchitra Krishnamoorthi : 'लेकीनं डेटिंग साईटवर टाकली प्रोफाईल अन्...'; सुचित्रा कृष्णमूर्तीने केला गौप्यस्फोट

B Praak Baby Death : "वडील म्हणून दु:ख वाटतयं...", बाळाचा जन्मत: मृत्यू झाल्यानंतर गायक बी प्राकची भावूक पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget