एक्स्प्लोर

Takatak 2 : 'टकाटक 2' येतोय प्रेक्षकांच्या भेटीस; 19 ऑगस्टला होणार रिलीज

19 ऑगस्ट 2022 रोजी 'टकाटक 2' (Takatak 2) संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

Takatak 2 : ' टकाटक'ला मिळालेल्या यशाच्या बळावर प्रेक्षकांचं दुप्पट मनोरंजन करण्याच्या उद्देशानं बनवण्यात आलेला सिक्वेल म्हणजेच 'टकाटक २' या चित्रपटाबाबत सर्वांच्याच मनात कुतूहल आहे. 'टकाटक २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार तरी कधी? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. 19 ऑगस्ट 2022 रोजी 'टकाटक 2' संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

पहिल्या भागाचं कथानक आणि त्या माध्यमातून दिलेला संदेश तरुणाईपासून सर्वच वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर आता 'टकाटक २'मध्ये काय पहायला मिळणार याची उत्सुकता आहे. 'टकाटक २'मध्ये प्रथमेश परब पुन्हा एकदा मिलिंद कवडे यांच्या चित्रपटाचा नायक बनला आहे. त्याच्यासोबत अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आणि इतर कलाकारांच्याही भूमिका आहेत.

'टकाटक'प्रमाणेच 'टकाटक २'देखील मनोरंजनातून काहीतरी संदेश देणारा असेल. या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण गोव्यात झालं असल्यानं गोव्यातील धमाल-मस्ती यात नक्कीच असेल. 'टकाटक २' हा चित्रपट प्रेक्षकांना 'टकाटक'च्या एक पाऊल पुढे घेऊन जाणारा असल्याचं मिलिंद कवडे यांचं म्हणणं आहे. 

'टकाटक २' निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

'टकाटक २'ची संकल्पना, कथा आणि पटकथा दिग्दर्शक मिलिंद कवडे यांची आहे. तरुणाईला आवडेल असं संवादलेखन करण्याची जबाबदारी किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी पार पाडली आहे. गीतलेखन जय अत्रेनं केलं असून, संगीतकार वरूण लिखतेनं संगीत दिलं आहे. डिओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. निलेश गुंडाळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. 19 ऑगस्ट 2022 रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
Kangana Ranaut On Gen Z: तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
Sushmita Mukherjee: 'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम
'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम
Malaika Arora: मलायका अरोरा बिझनेसमनच्या प्रेमात; 19 वर्षांनी लहान जोडीदार का निवडला? 'या' व्यक्तिने उलगडलं गुपित
मलायका अरोरा बिझनेसमनच्या प्रेमात; 19 वर्षांनी लहान जोडीदार का निवडला? 'या' व्यक्तिने उलगडलं गुपित

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Embed widget