एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 15 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment news today live updates latest Bollywood news today 15 September 2022 celebrity news movie trailer and movie review Bollywood big breaking Marathi news Entertainment News Live Updates 15 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुस्साट! दमदार कलेक्शनमुळे पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या शेअर्समध्ये वाढ!

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटानं ग्लोबल बॉक्स ऑफिसवर 211 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सोमवारी (12 सप्टेंबर) सकाळी जेव्हा शेअर बाजाराच्या व्यवहाराची सुरुवात झाली तेव्हा पीव्हीआरच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली. पीव्हीआरचे शेअर्स 5.10 टक्के वाढून 1928 रुपये पर्यंत पोहोचला.तर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये देखील वाढ झाली आहे. आयनोक्सच्या शेअर्समध्ये  5.40 टक्के वाढ नोंदवण्यात आली. आयनॉक्सचा शेअर 4.30 टक्यांनी वधारत  515 रुपयांवर व्यवहार करत होता. तर पीव्हीआरचा शेअर 3.62 टक्क्यांनी वधारत 1900 रुपयांवर व्यवहार करत होता.

गोकुळधाम सोसायटीत नक्की कोण परतणार? निर्माते असित कुमार मोदींने दिले संकेत!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेने प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. मात्र, सध्या ही मालिका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. या मालिकेतील बऱ्याच कलाकारांनी सध्या मालिकेला रामराम ठोकला आहे. मात्र, आता यातील काही पात्र आता मालिकेत परत येणार आहेत. याचे संकेत स्वतः निर्माते असित कुमार मोदी यांनी दिले आहेत.

‘कॉमेडी किंग’ ओंकार भोजनेची नवी भरारी! आगामी चित्रपटात पहिल्यांदाच झळकणार मुख्य भूमिकेत

छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेल्या 'कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काही पण', ' एकदम कडक' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने (Onkar Bhojane). कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि 'अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..' या ओंकारच्या संवादाने तर समस्त प्रेक्षकांना वेड लावले. आता हाच कॉमेडी किंग लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.

लायगर फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडाची पहिली पोस्ट; म्हणाला...

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा लायगर (Liger) हा चित्रपट फ्लॉप ठरला. अनन्या पांडेचा अभिनय आणि कथानक यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला असं अनेकांचे मत आहे. आता लायगर फ्लॉप ठरल्यानंतर विजयनं पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला विजयनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.

17:08 PM (IST)  •  15 Sep 2022

Thank God : 'थँक गॉड' मधील भूमिकेसाठी सिद्धार्थ अन् अजय देवगणनं घेतलं एवढं मानधन; जाणून घ्या इतर कलाकारांची फी

Thank God : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  अजय देवगणच्या (Ajay Devgn) थँक गॉड ( Thank God) या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. अजयसोबतच या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊयात कलाकारांच्या मानधनाबाबत...

वाचा सविस्तर बातमी 

13:31 PM (IST)  •  15 Sep 2022

Boom Padi Song : 'माजा मा' गाण्यातील 'बूम पडी' गाणं रिलीज

Boom Padi Song:  'माजा मा' चित्रपटातील 'बूम पडी' गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात माधुरी गरबा खेळताना दिसत आहे. प्राइम व्हिडीओवर माजा मा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात माधुरीसोबतच गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंह, सृष्टि श्रीवास्तव, रजित कपूर, शीबा चड्ढा, सिमोन सिंह, मल्हार ठाकर आणि निनाद कामत हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

12:33 PM (IST)  •  15 Sep 2022

Palyad Marathi Movie : 'पल्याड' मधील शशांक शेंडेंचा लक्षवेधी लूक; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Palyad Marathi Movie : काही कलाकार भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत घ्यायला तयार असतात. कोणी वजन वाढवतं, तर कोणी वजन घटवतं... कोणी टक्कल करतं, तर कोणी केस वाढवतं... तर काही कलाकार तास न तास आरशासमोर बसून मेकअपच्या माध्यमातून आपला लूकच बदलतात. कोणतीही व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे साकारण्यात माहिर असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत शशांक शेंडे. शशांक यांनी आजवर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मनाचा थरकाप उडवणाऱ्या भाईपासून पिचलेल्या शेतकऱ्यापर्यंत आणि शहरातील सर्वसामान्य गृहस्थापासून खेड्यातील गावकऱ्यापर्यंत सर्वच भूमिकांमध्ये शशांक यांनी जीव ओतला आहे. आता पुन्हा एकदा ते नव्या गेटअपमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'पल्याड' या आगामी मराठी चित्रपटात रसिकांना शशांक यांचा खास लूक पहायला मिळणार आहे.


12:06 PM (IST)  •  15 Sep 2022

Resham : पाण्यात प्लास्टिक बॅग टाकल्यामुळे पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोल

Pakistani Actress Resham Troll: पाकिस्तानी अभिनेत्री  रेशमचा (Resham) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती पाण्यामध्ये प्लास्टिक बॅग टाकताना दिसली. या व्हिडीओला कमेंट करुन रेशमला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Irfanistan (@irfanistan)

11:51 AM (IST)  •  15 Sep 2022

Urmila Matondkar : लग्नानंतर सहा वर्षांनी उर्मिला आणि मोहसिन झाले आई-वडील? व्हायरल पोस्टवर उर्मिलानं दिली प्रतिक्रिया

Urmila Matondkar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा (Urmila Matondkar) चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. मार्च 2016 मध्ये उर्मिलानं  मोहसिन अख्तरसोबत (Mohsin Akhtar) लग्रनगाठ बांधली. काही दिवसांपूर्वी मोहसिननं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मोहसिनसोबत एक चिमुकली मुलगी दिसत आहे. फोटो शेअर करुन मोहसिननं त्याला खास कॅप्शन देखील दिलं. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. फोटो व्हायरल झाल्यानंतर उर्मिला आणि मोहसिन हे आई-वडील झाले आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. यावर आता उर्मिलानं प्रतिक्रिया दिली आहे. 

 वाचा सविस्तर बातमी

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget