![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Urmila Matondkar : लग्नानंतर सहा वर्षांनी उर्मिला आणि मोहसिन झाले आई-वडील? व्हायरल पोस्टवर उर्मिलानं दिली प्रतिक्रिया
फोटो व्हायरल झाल्यानंतर उर्मिला आणि मोहसिन हे आई-वडील झाले आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला.
![Urmila Matondkar : लग्नानंतर सहा वर्षांनी उर्मिला आणि मोहसिन झाले आई-वडील? व्हायरल पोस्टवर उर्मिलानं दिली प्रतिक्रिया urmila matondkar and mohsin akhtar break silence on rumors of baby Urmila Matondkar : लग्नानंतर सहा वर्षांनी उर्मिला आणि मोहसिन झाले आई-वडील? व्हायरल पोस्टवर उर्मिलानं दिली प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/15/be59bc680fe46a6727ca63313ec957371663221893950259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Urmila Matondkar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा (Urmila Matondkar) चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. मार्च 2016 मध्ये उर्मिलानं मोहसिन अख्तरसोबत (Mohsin Akhtar) लग्रनगाठ बांधली. काही दिवसांपूर्वी मोहसिननं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मोहसिनसोबत एक चिमुकली मुलगी दिसत आहे. फोटो शेअर करुन मोहसिननं त्याला खास कॅप्शन देखील दिलं. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. फोटो व्हायरल झाल्यानंतर उर्मिला आणि मोहसिन हे आई-वडील झाले आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. यावर आता उर्मिलानं प्रतिक्रिया दिली आहे.
मोहसिनची पोस्ट
मोहसिननं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक छोटी मुलगी दिसत आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'छोटी राजकुमारी, तू माझ्या हृदयावर राज्य करतेस. तुला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा' या फोटोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी प्रश्न विचारला की, 'ही तुमची मुलगी आहे का?' त्यानंतर मोहसिननं ही पोस्ट एडिट करुन 'माझी भाची' असं लिहिलं.
उर्मिलाची प्रतिक्रिया
एका मुलाखतीमध्ये उर्मिलानं देखील प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, 'आयरा माझ्या भावाची मुलगी आहे. मला अनेक जण शुभेच्छा देण्यासाठी मेसेज करत होते. त्यानंतर मी पोस्ट एडिट करायला सांगितली.'
View this post on Instagram
काही महिन्यांपूर्वी उर्मिलाला आई होण्याबाबत, तसेच दत्तक मुलं घेण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नांना उत्तर देताना उर्मिला म्हणाली, 'आई होण्याचा निर्णय जेव्हा मी घेईल तेव्हा मी सांगेन. मी अजून या विषयी जास्त विचार केला नाही. प्रत्येक महिलेनं आई व्हायलाच हवं अस काही नाही. मला लहान मुलं आवडतात. पण जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना प्रेम देण्याची तसेच त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना जन्म द्यावा लागतो, असं नाहीये '
उर्मिलानं 2019 मध्ये राजकारणात एन्ट्री केली. उर्मिलाच्या दीवानगी, रंगीला आणि शिकार या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
Urmila Matondkar : उर्मिला तू आई कधी होणार? मुलाखतीत दिलं उत्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)