Entertainment News Live Updates 13 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Popatlal : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील पत्रकार पोपटलाल कोट्यवधींचा मालक
TMKOC Popatlal Shyam Pathak Net Worth : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah) ही छोट्या पडद्यावरील मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका अव्वल ठरत असते. मालिकेसह मालिकेतील कलाकारदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या मालिकेतील एक कलाकार म्हणजेच पत्रकार पोपटलाल (Popatlal). मालिकेतील कंजूस पोपटलाल खऱ्या आयुष्यात मात्र खूपच श्रीमंत आहे.
पोपटलाल ही भूमिका मालिकाप्रेमींच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत पोपटलाल खूप कंजूस असलेला पाहायला मिळतो. त्याचं हे कंजूस असणं त्याच्या चाहत्यांना आवडतं. पण मालिकेतील कंजूस पोपटलाल खऱ्या आयुष्यात कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
Ghar Bandook Biryani: 'आशेच्या भांगेची नशा भारी...'; नागराज मंजुळेंच्या 'घर, बंदूक, बिरयानी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच त्याचा 'घर, बंदूक, बिरयानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतंच नागराजनं या चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. या पोस्टरला त्यानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
Shehzada Trailer OUT : अॅक्शन, ड्रामा अन् कॉमेडी; कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननच्या ‘शहजादा’ चा ट्रेलर पाहिलात?
अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) ‘शहजादा’ (Shehzada) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कार्तिकचा स्वॅग आणि क्रिती सेननचा (kriti sanon) ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवरुन शहजादा या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. "फैमिली पर आए तो डिसकशन नहीं करते हैं एक्शन करते हैं." हा डायलॉग शहजादा चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला ऐकायला येतो. क्रिती सेनन आणि क्रिती सेनन यांच्यासोबतच या चित्रपटात परेश रावल, राजपाल यादव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अल्लू अर्जुनच्या ‘अला वैंकुठपुरमलो’ या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे, असंही म्हटलं जात आहे. रोहित धवननं शहजादा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Sunil Holkar Passed Away : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन
Sunil Holkar Passed Away : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते सुनील होळकर (Sunil Holkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
View this post on Instagram
Tunisha Sharma Case : तुनिषा आत्महत्येप्रकरणी शिझान खानच्या जामीन अर्ज वसई न्यायालयाने फेटाळला
Tunisha Sharma Case : तुनिषा आत्महत्येप्रकरणी शिझान खानच्या जामीन अर्ज वसई न्यायालयाने फेटाळला आहे. शिजान खानच्या जामीन अर्जावर शनिवारी 7 जानेवारीला, सोमवारी 9 जानेवारीला आणि बुधवारी 11 जानेवारीला शिजानच्या वकीलाने आणि फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी आपली बाजू मांडली होती. त्यावर आज वसई न्यायालय आपला फैसला सुनावणार आहे. 31 डिसेंबरला वसई न्यायालयान शिझान खानला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून, आज सिजानची कोठडी ही संपलेली आहे.
Rang Maza Vegla : दीपा-कार्तिकच्या लग्नात पैठणीची थीम
Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. गेले कित्येक दिवस ज्या दिवसाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो दिवस अखेर दीपा-कार्तिकच्या आयुष्यात आला आहे.
View this post on Instagram
Bigg Boss 16 : भारती सिंहच्या लेकाची भाईजानच्या 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
Bigg Boss 16 : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) स्क्रीन शेअर करणं प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. कॉमेडी क्वीन भारती सिंहचा (Bharti Singh) गोला (Golla) मात्र याला अपवाद ठरला आहे. 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) आगामी भागात सलमान खानसोबत गोला स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
View this post on Instagram
Lisa Marie Presley Death : अमेरिकन गायिका लिसा मॅरी प्रेस्ली यांचे निधन
Lisa Marie Presley Death : अमेरिकन गायिका लिसा मॅरी प्रेस्ली यांचे निधन झाले आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Lisa Marie Presley, singer and daughter of Elvis Presley passes away at the age of 54 after being hospitalised for a medical emergency, reports US media
— ANI (@ANI) January 13, 2023
(Photo source: Presley's Twitter handle) pic.twitter.com/9AJFg9VXQD