Entertainment News Live Updates 12 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्कLast Updated: 12 Jan 2023 06:22 PM

पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय...More
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) देशमुखचा 'वेड' (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात रितेशने अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका बजावली आहे. रितेशने एकाचवेळी अभिनय आणि दिग्दर्शन कसं जमवलं यासंदर्भात एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक रोहन कोतेकर म्हणाला,"दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम करताना रितेश देशमुख वेगवेगळ्या दृष्टीने काम करतात. कॅमेऱ्यासमोर काम करताना रितेश आपले शंभर टक्के देतातच पण कॅमेऱ्या मागे काम करतांना देखील त्यांनी आपले शंभर टक्के देले आहेत. दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही भूमिका मध्ये स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ करणं त्यांना उत्तमप्रकारे जमलं आहे".Entertainment : IMDb द्वारे 2023 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा; पाहा चित्रपटांची यादीEntertainment News : अनेकदा चित्रपटाचे रिव्ह्यू वाचून, किंवा लोकांशी संवाद साधून नाहीतर मग तो चित्रपट स्वत: पाहून इतरांना सांगणे हे बऱ्याचदा होत असते. पण प्रेक्षकांनी कोणते सिनेमे पाहावेत. कोणत्या सिनेमांबाबत उत्सुकता आहे. याबाबत IMDb माहिती देते. IMDb च्या मासिक 20 कोटी यूजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला पठान हा 2023 चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे.IMDb ह्या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीज संदर्भातील जगातल्या सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोताद्वारे आज 2023 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा केली गेली. पूर्ण 2022 मधील IMDb यूजर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची यादी निर्धारित केली आहे.Happy Birthday Mithila Palkar : 'लिटील थिंग्स'मधली काव्या ते 'मुरांबा'ची इंदू; जाणून घ्या 'वेब सीरिज क्वीन' मिथिला पालकरचा प्रवास...Mithila Palkar : अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) अल्पावधीतच घराघरात पोहोचली आहे. कुरळ्या केसांच्या या गोड मुलीचा आज वाढदिवस आहे. मिथिलाला 'वेब सीरिजची क्वीन' म्हटले जाते. मिथिला नेहमीच प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न करत असते. मिथिला पालकरचा जन्म 11 जानेवारी 1993 रोजी मुंबईत झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मिथिलाचं बालपण दादरमध्ये गेलं. शाळेत असतानाच तिला अभिनयाची आणि नृत्याची गोडी निर्माण झाली. शाळेत असतानाच तिने अनेक नाटकात भाग घेतला. Tunisha Sharma Case : तारीख पे तारीख! शिझान खानच्या जामीन अर्जावर 13 जानेवारीला सुनावणी Sheezan Khan Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानच्या (Sheezan Khan) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिझान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. पण त्याला आजही जामीन मिळालेला नाही. शिझान खानच्या वकिलांनी 9 जानेवारीला बाजू मांडली होती. त्यानंतर आज फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. यावर आज दोन्ही पक्षाच्या वकिलांनी दिड तास युक्तीवाद केला. दोन्ही वकिलांची बाजू ऐकल्यावर न्यायलयानं 13 जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती दिली.
Ali Baba Dastaan E Kabul : 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' मालिकेत शिझान खानची जागा घेणार अभिषेक निगम
Ali Baba Sheezan Khan Replacement : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' (Ali Baba Dastaan E Kabul) ही मालिका चर्चेत आली. आता या मालिकेसंदर्भात एक महत्तावाची अपडेट समोर आली आहे. या मालिकेत तुनिषा शर्मा आणि शिझान खान (Sheezan Khan) मुख्य भूमिकेत होते. पण आता तुनिषाच्या आत्महत्येमुळे शिझान खान सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तुनिषाच्या निधनानंतर या मालिकेचं शूटिंग बंद होतं. पण आता मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अभिनेता अभिषेक निगम (Abhishek Nigam) तुनिषाची जागा घेणार आहे.