Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?

स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झालाय. यानंतर सानिया मिर्झाचे नाव भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीसोबत जोडले गेले. पण सानिया मिर्झाच्या वडिलांनी या सर्व अफवा फेटाळून लावल्या. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सानिया मिर्झाचे नाव एखाद्या स्टारसोबत जोडले जाण्याची ही पहिली वेळ नाही. शोएब मलिकसोबत लग्नाआधी सानिया मिर्झाचे नाव बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबत जोडले गेले होते. करीना कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर दोघेही जवळ आल्याचे बोलले जाते. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

सानिया मिर्झाचे नाव भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतही जोडले गेलेय. दोघंही अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले होते. मात्र, दोघांनीही या नात्यावर कधीच काहीही भाष्य केले नाही. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
सानिया मिर्झाचे नाव भारतीय टेनिसपटू महेश भूपती याच्यासोबत जोडले गेले होते. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
सानिया मिर्झाचं नाव मराट साफिनसोबत जोडलं गेलं, पण दोघांनीही हे नातं कधीच स्वीकारलं नाही. मात्र, या नात्याची चर्चा खूप झाली होती. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया मिर्झा आणि दक्षिणेतील अभिनेता नवदीप पल्लापोलू हे दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती, अशी चर्चा होती. पण नंतर दोघांनी याला फक्त मैत्रीचे नाव दिले. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
शोएब मलिकसोबत लग्न करण्यापूर्वी सानिया मिर्झाने 2009 मध्ये तिचा बालपणीचा मित्र सोहराब मिर्झासोबत एंगेजमेंट केली होती, मात्र हे नातं फक्त सहा महिने टिकले होते. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)