पुणे : रेल्वे स्थानक असो किंवा एखादा मॉल प्रत्येक ठिकाणी आता जिन्याची जागा एस्केलेटर म्हणजेच सरकत्या जिन्यांनी घेतली आहे. या सरकत्या जिन्यावर पाय ठेवतात काही मिनिटांमध्ये आपण कुठलेही कष्ट न घेता आपण ये जा करू शकतो. परंतु हे सरकते जिने कधीकधी जीव घेणे देखील ठरू शकतात. याची प्रचिती पुण्यात आली आहे. पुण्यातील मेट्रो (Pune Metro Station) स्थानकात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर मृत्यू झाला आहे. मनोज कुमार असे प्रवाशाचे नाव आहे. मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावर अचानक पडला आणि यात त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे नेमके कारण पोलीस तपासत आहेत. स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV) पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी 5.30 वाजता ही घटना घडली. पुण्यातील जिल्हा न्यायालय या स्थानकावर मनोज जात असताना अचानक ते सरकत्या जिन्यावर पडले . त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या शवविच्छेदनात मृत्यूचे नेमके कारण समोर येईल मात्र अद्याप हा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालयात मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता सरकत्या जिन्यावरून जाताना मृत्यू झाला. स्थानकातील मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावर जाताना अचानक प्रवासी मनोज कुमार पडले. मनोज कुमार यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शवनिच्छेदनातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. मात्र, त्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मनोज कुमार यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर मनोज कुमार राहत असलेल्या परिसरातही शोककळा पसरली आहे.
पुणे मेट्रोच्या संख्येत दुपटीने वाढ
पुणे मेट्रोची (Pune Metro) विस्तारित मार्गांवरील सेवा सुरू झाली आहे. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पुणे मेट्रोने 30 जून रोजी 1,99,437 प्रवाशांची विक्रमी संख्या गाठून तब्बल 24,15,693 ची एकूण कमाई केली, जी आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे.
हे ही वाचा :
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात प्रवासी संख्येत दुपटीने वाढ