Entertainment News Live Updates 12 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 12 Dec 2022 04:08 PM
Ram Charan: राम चरण आणि उपासनाच्या घरी होणार चिमुकल्याचं आगमन, पोस्ट शेअर करत दिली चाहत्यांना माहिती

Ram Charan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राम चरण(Ram Charan) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण सध्या राम चरण हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राम चरण आणि त्याची पत्नी उपासना (Upasana) यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली. 



Trp : प्राइम टाइम संगे चाले टीआरपीचा खेळ

Marathi Serial Trp Rating : गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका (Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. निर्माते वेगवेगळ्या कथानकासह नव-नवीन प्रयोग करत आहे. नाटक (Drama), सिनेमे (Movie), ओटीटी (Ott) कितीही गोष्टी आल्या तरी मालिकांची (Marathi Serial) जागा कोणीही घेऊ शकलेलं नाही. ग्रामीण भागातील प्रेक्षकांसह शहरी भागातील मालिकाप्रेमींना आवडतील अशा मालिकांची निर्मिती करण्यात येत आहे. 


Trp : प्राइम टाइम संगे चाले टीआरपीचा खेळ; कसं ठरतं TRP चं गणित? जाणून घ्या...

Sarla Ek Koti : 'सरला एक कोटी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Onkar Bhojane On Sarla Ek Koti : आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर ओंकार भोजने (Onkar Bhojane) आता एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओंकार भोजने आता मोठं स्क्रिन गाजविण्यासाठी सज्ज आहे. ओंकारची मुख्य भूमिका असलेला 'सरला एक कोटी' (Sarla Ek Koti) या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. 





Pathaan Song Besharam Rang : दीपिकाच्या ग्लॅमरस अदा तर शाहरुखचा स्वॅग; 'पठाण' सिनेमातील पहिलं गाणं आऊट

Pathaan Song Besharam Rang : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या आगामी 'पठाण' (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'बेशरम रंग' (Besharam Rang) असे या गाण्याचे नाव आहे. 





Sushant Singh Rajput Falt : अडीच वर्षानंतरही सुशांत सिंह राजपूतचा 'तो' फ्लॅट रिकामाच

Sushant Singh Rajput Flat : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुशांतचं निधन झालं तेव्हा तो वांद्रे येथील एका आलिशान फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर आता अडीच वर्षानंतरही फ्लॅटच्या मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 





Shehnaaz Gill : शहनाज गिल Sidharth Shukla च्या आठवणीत भावूक

Shehnaaz Gill Celebrating Sidharth Shukla Birthday : दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा (Sidharth Shukla) आज वाढदिवस आहे. सिद्धार्थच्या आठवणीत शहनाज गिल (Shehnaaz Gill) भावूक झाली आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 



Bigg Boss 16 : रॅपर एमसी स्टेन Abdu Rozik वर भडकला

Bigg Boss 16 Abdu Rozik : 'बिग बॉस 16'मध्ये (Bigg Boss 16) अब्दू रोजिक (Abdu Rozik) लक्षवेधी ठरतो आहे. अब्दूचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात रॅपर एमसी स्टेन (MC Stan) अब्दूवर भडकलेला दिसून आला. त्यानंतर सोशल मीडियावर अब्दूच्या चाहत्यांनी एमसी स्टेनची चांगलीच शाळा घेतली. 





Snehlata Vasaikar : 'बिग बॉस मराठी'च्या घरातून स्नेहलता वसईकर आऊट

Snehlata Vasaikar : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) घर या आठवड्यात सदस्यांनी चांगलंच गाजवलं नाही तर घरात धुडगूस घातला. या आठवड्यात स्नेहलता वसईकरला (Snehlata Vasaikar) घराबाहेर पडावं लागलं आहे. या पर्वात स्नेहलता वसईकरची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. 





Happy Birthday Rajinikanth : बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाडचा 'रजनीकांत' कसा झाला?

Rajinikanth : जगभरात लोकप्रिय असणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा आज जन्मदिन आहे. 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरूमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 'थलायवा' (Thalaiva) रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Drishyam 2 : अजय देवगणचा 'दृश्यम 2' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील


Drishyam 2 Collection : वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'दृश्यम 2' (Drishyam 2) या सिनेमाचा समावेश आहे. हा रहस्यमय सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 'दृश्यम 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रिलीजच्या 23 दिवसांत हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 18 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षक पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन पाहत आहेत. रिपोर्टनुसार, या सिनेमाने रिलीजच्या चौथ्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर 4.65 कोटींची कमाई करत 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 


Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवी मालिका


Pratishodh Zunj Astitvachi : गेल्या काही दिवसांत आशयघन विषय असलेल्या वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता 'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' (Pratishodh Zunj Astitvachi) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


Sai Pallavi : 'या' ब्लॉकबस्टर सिनेमाच्या माध्यमातून साई पल्लवी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण


Sai Pallavi Bollywood Debut : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) दाक्षिणात्य सिनेमांचा (South Movies) दबदबा आहे. अनेक दाक्षिणात्य सिनेमे आणि वेबसीरिज हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहेत. कोरोनानंतर सिनेरसिक जागतिक पातळीवरचे सिनेमे पाहू लागले आहेत. हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य सिनेमे धुमाकूळ घालत असताना आता दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी सज्ज आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.