Marathi Serial : 'रंग माझा वेगळा'ने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी; 'माझी तुझी रेशीमगाठ'चं स्थान घसरलं
Marathi Serial Trp Rating : मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते.
![Marathi Serial : 'रंग माझा वेगळा'ने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी; 'माझी तुझी रेशीमगाठ'चं स्थान घसरलं Marathi Serial rang maza vegla wins TRP race The position of Mazhi Tuzhi Reshimgath marathi serial has fallen Marathi Serial : 'रंग माझा वेगळा'ने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी; 'माझी तुझी रेशीमगाठ'चं स्थान घसरलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/11/fd0c10f699e1c26d65ea965692988dac1670738490222254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...
1. टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.
2. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
3. टीआरपी लिस्टमध्ये 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे.
4. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे.
5. 'आई कुठे काय करते' हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे.
6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.8 रेटिंग मिळाले आहे.
7. टीआरपीच्या शर्यतीत 'आता होऊ दे धिंगाणा' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे.
8. 'स्वाभिमान' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.8 रेटिंग मिळाले आहे.
9. नव्या स्थानावर 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका आहे. या मालिकेला 4.7 रेटिंग मिळाले आहे.
10. 'अबोली' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.5 रेटिंग मिळाले आहे.
स्टार प्रवाहच्या मालिका हिट
टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या तेरा मालिका या स्टार प्रवाहच्या आहेत. त्यानंतर झी मराठीची 'नवा गडी नवं राज्य' आणि 'दार उघडे बये' या मालिका तेराव्या - चौदाव्या क्रमांकावर आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या दहात होती. पणमालिकेची वेळ बदलल्यामुळे या मालिकेचं स्थान घसरलं आहे. या मालिकेला फक्त 1.7 रेटिंग मिळाले आहे.
संबंधित बातम्या
Marathi Serial : टीआरपीच्या शर्यतीत 'बिग बॉस मराठी' पडला मागे; 'रंग माझा वेगळा' मालिकेने मारली बाजी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)