Entertainment News Live Updates 1 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Yetoy To Khatoy : हृषिकेश जोशीचं नवं नाटक 'येतोय तो खातोय'!
Yetoy To Khatoy : अभिनेता, दिग्दर्शक, लेखक हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) 'येतोय तो खातोय' (Yetoy to Khatoy) या नव्या नाटकाच्या (Marathi Natak) माध्यमातून रंगभूमीवर येत आहेत. या नाटकाच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय विसंगतीवर भाष्य करण्यात येणार आहे.
Lalita Shivaji babar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'ललिता शिवाजी बाबर'चा टीझर लॉंच
Lalita Shivaji Babar Teaser Out : प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच 'ललिता शिवाजी बाबर' हिच्या आयुष्यावर आधारित 'ललिता शिवाजी बाबर' (Lalita Shivaji Babar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते या सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), ललिता बाबर, अमृता खानविलकरसह (Amruta Khanvilkar) अनेक मान्यवर उपस्थित होते.
अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत
अभिनेत्री सनी लिओनीला (Sunny Leone) शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. सनी लिओनी सध्या 'ओह माय घोस्ट' (Oh My Ghost) या दाक्षिणात्य सिनेमाचं शूटिंग करत आहे. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ती जखमी (Sunny Leone Injured) झाली आहे.
'दसरा' चा टीझर पाहून एस.एस राजामौली झाले इम्प्रेस
दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नानी (Nani) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. नानीचा 'दसरा' (Dasara) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची नानीचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षरकांच्या भेटीस आला. या टीझरमधील नानीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. या चित्रपटाच्या टीझरचं प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांनी कौतुक केलं आहे.
Budget 2023: अर्थसंकल्पावर विवेक अग्रिहोत्री यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा अर्थसंकल्प अत्यंत...'
Budget 2023: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पातून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्रिहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांचे कौतुक केले आहे.
Brilliant budget.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) February 1, 2023
Congratulations @narendramodi and @nsitharamanoffc.
More power to Bharat.
Urfi Javed: 'असं वाटतंय मला कोणीतरी मारलंय'; उर्फीच्या पोस्टनं वेधलं साऱ्यांचं लक्ष
Urfi Javed: मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधते. नुकताच उर्फीनं तिचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. या फोटोला उर्फीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
Pathaan Box Office Collection: 'पठाण'समोर केजीएफ आणि बाहुबलीही फिके; सात दिवसांत केली एवढी कमाई
Pathaan Box Office Collection: अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. पठाण हा चित्रपट भारताबरोबरच परदेशात देखील कोट्यवधींची कमाई करत आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पठाण चित्रपट रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत. सात दिवसात या चित्रपटानं भारतामध्ये 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं सात दिवसांचे कलेक्शन...
‘PATHAAN’ FASTEST TO ENTER ₹ 300 CR CLUB…
— taran adarsh (@taran_adarsh) January 31, 2023
⭐️ #Pathaan: Day 7
⭐️ #Baahubali2 #Hindi: Day 10
⭐️ #KGF2 #Hindi: Day 11
⭐️ #Dangal: Day 13
⭐️ #Sanju: Day 16
⭐️ #TigerZindaHai: Day 16
⭐️ #PK: Day 17
⭐️ #War: Day 19
⭐️ #BajrangiBhaijaan: Day 20
⭐️ #Sultan: Day 35#India biz. Nett BOC. pic.twitter.com/xmoBvX0m9g
Kedar Shinde : "तुम्ही हे गौरव गीत जगभर गाऊन प्रसिद्ध केलं"; 'गर्जा महाराष्ट्र'ला राज्यगीताचा दर्जा दिल्यानंतर केदार शिंदेंची आजोबांसाठी खास पोस्ट
Kedar Shinde On Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' (Jai Maharashtra Maza) हे गीत ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. राजा बढे यांनी लिहिलेल्या या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. यावर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एक खास पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
Sanjay Dutt : साऊथ सुपरस्टार विजयच्या 'थलपती 67'मध्ये झळकणार संजू बाबा!
Sanjay Dutt Thalapathy 67 Big Update : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचा (THalapathy Vijay)'थलापती 67' (Thalapathy 67) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाली असून विजयचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमातील संजय दत्तचा (Sanjay Dutt) फर्स्ट लूक आऊट झाला आहे.
View this post on Instagram