Actress Sulochana: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 04 Jun 2023 09:35 PM
Actress Sulochana: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Sulochana Passed Away: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. Read More
Sulochana : चित्रपटसृष्टीचं ममत्व हरपलं! ज्येष्ठ अभिनेते आणि नेत्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया...
Sulochana Latkar Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे नुकतंच मुंबईत निधन झालं, त्यांच्या निधनानंतर अनेक ज्येष्ठ नेते आणि दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. Read More
Sulochana Passed Away: लहानपणी आई वडिलांचं छत्र हरपलं, मावशीच्या बोटाला धरुन कोल्हापुरात; रंगू असलेल्या दीदींना ‘सुलोचना’ नाव कसं मिळालं?
Sulochana: ग्रामीण भागातून आलेल्या रंगूकडे प्रतिभेची कमी नव्हतीच, त्यामुळे भालजी पेंढारकरांसारख्या महारथीला ही प्रतिभा ओळखण्यास फार वेळ लागला नाही आणि त्यांच्या सुलोचना शिष्या होऊन गेल्या. Read More
Sulochana Memory With Amitabh Bacchan:  सुलोचना दीदींच्या 'त्या' पत्राने भारावले होते बिग बी अमिताभ बच्चन
Sulochana Memory With Amitabh Bacchan:  मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन झाले आहे. सुलोचना यांच्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत काही खास आठवणी होत्या. Read More
Sulochana: चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन
Actress Sulochana : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा शेवट झाला असल्याचे म्हटले जात आहे.  Read More
Sulochana : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. Read More
Maharashtra Television News तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Shark Tank India 3 : 'शार्क टॅंक इंडिया 3' लवकरच होणार सुरू; प्रोमो आऊट!
Shark Tank India : 'शार्क टॅंक इंडिया'चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Marathi Serial : टीआरपीच्या खेळात जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ठरली नंबर वन; जाणून घ्या TRP Report
Marathi Serial Trp Rating : मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. Read More
Shivangi Joshi : शिवांगी जोशी आता झळकणार एकता कपूरच्या मालिकेत; 19 जूनपासून सुरू होणार 'बरसाते'
Shivangi Joshi : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशी पुन्हा एकदा मालिकाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. Read More
Chiranjeevi : चिरंजीवीला कॅन्सर? अभिनेत्याने ट्वीट करत दिली माहिती; म्हणाला,"कॅन्सरबद्दल..."
Chiranjeevi : चिरंजीवीला कॅन्सर झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. Read More
TRP : टीआरपीच्या शर्यतीत 'अनुपमा'ने मारली बाजी; 'तारक मेहता का उल्टा चष्मा' पडलं मागे
Trp Report : बार्कने नुकताच टीआरपी रिपोर्ट जाहीर केला असून या आठवड्यात 'अनुपमा' मालिकेने बाजी मारली आहे. Read More
Aamir Raza Husain : अभिनेते आमिर रजा हुसैन यांचं निधन; वयाच्या 66 व्या घेतला अखेरचा श्वास
Aamir Raza Husain : अभिनेते आमिर रजा हुसैन यांचे निधन झाले आहे. Read More
Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad Wedding : 'त्या' चर्चांना अखेर पूर्णविराम! ऋतुराज आणि उत्कर्षाचा रोमँटिक फोटो शेअर करत सायली संजीव म्हणाली,"तुमच्यासाठी..."
Ruturaj Gaikwad Wedding : क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड नुकताच लग्नबंधनात अडकला असून आता अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. Read More
Happy Birthday Ashok Saraf : वडिलांच्या इच्छेसाठी बॅंकेत नोकरी करायचे अशोक सराफ; जाणून घ्या मराठी सुपरस्टारला मामा नाव कसं पडलं?
Ashok Saraf : बहुरुपी अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटी-2 मध्ये होणार 'या' गायकाची एन्ट्री?


Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीच्या सीझन 2 (Bigg Boss OTT 2) ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा शो जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये  कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत? जे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता  बिग बॉस ओटीटी 2 मध्ये एका गायकाची एन्ट्री होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 
गायक अभिजीत सावंत हा बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अभिजीत हा इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला होता. आता तो बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.याबाबत अभिजीतनं कोणतीही माहिती दिलेली नाही.


Aryan Shahrukh Khan : आर्यन खानच्या वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात


Aryan Khan Shooting Started : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लेक आर्यन खान (Aryan Khan) सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. आर्यन खान दिग्दर्शित पहिली वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजच्या शूटिंगला आता सुरुवात झाली असून या सहा भागांच्या वेबसीरिजसाठी चाहते उत्सुक आहेत. शाहरुख खान या वेबसीरिजची निर्मिती करत आहे.


Adipurush : प्रभासच्या 'आदिपुरुष'चा रिलीजआधीच धमाका, रिलीजआधीच केली 432 कोटींची कमाई!


Prabhas kriti Sanon Adipurush Movie : प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 16 जून 2023 रोजी हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजआधीच या सिनेमाने 432 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.