Rishabh Pant IPL 2025 : IPL 2025 च्या मेगा लिलावात ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. पंत आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की पंतला आयपीएलचे संपूर्ण 27 कोटी रुपये मिळणार नाहीत. त्याच्या पगारातील मोठा हिस्सा कर म्हणून कापला जाईल. चला तर मग जाणून घेऊया की 27 कोटी रुपयांपैकी पंतांना टॅक्स कापल्यानंतर किती पगार मिळेल.  मिळालेल्या माहितीनुसार पंतला सरकारला कर म्हणून 8.1 कोटी रुपये द्यावे लागतील, त्यानंतर त्यांना 27 कोटी रुपयांपैकी केवळ 18.9 कोटी रुपये आयपीएल पगार म्हणून मिळतील.


जखमी झाला, तर पैसे मिळतील का?


IPL 2025 पूर्वी कोणताही खेळाडू दुखापत झाल्यास, संघ बदली म्हणून दुसऱ्या खेळाडूचा समावेश करू शकतो. त्याचवेळी, टीम इंडियाकडून खेळताना भारतीय खेळाडूला दुखापत झाल्यास, त्याला त्याचे पूर्ण वेतन मिळेल कारण बीसीसीआय भारतीय खेळाडूंना विमा प्रदान करते.


ऋषभ पंत सध्या ऑस्ट्रेलियात 


सध्या पंत बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. आता मालिकेतील दुसरी कसोटी 06 डिसेंबरपासून ॲडलेडच्या ओव्हलवर खेळवली जाणार आहे.


ऋषभ पंतची आयपीएल कारकीर्द


ऋषभ पंतने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 110 डावांमध्ये त्याने 35.31 च्या सरासरीने आणि 148.93 च्या स्ट्राईक रेटने 3284 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 1 शतक आणि 18 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये उच्च धावसंख्या 128* धावा आहे. पंतने 2016 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो 2016 ते 2024 या कालावधीत दिल्ली कॅपिटल्स या एकाच संघाकडून खेळला. आता पंत पहिल्यांदाच 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या माध्यमातून दुसऱ्या संघासाठी आयपीएल खेळताना दिसणार आहे.


लखनौ सुपर जायंट्स


आतापर्यंत खर्च - 119.90 कोटी रु.


किती बाकी आहेत


10 लाख 


- खेळाडू खरेदी केले


24/25


विदेशी खेळाडूंना खरेदी करण्यात आले


6/8 


लखनौ सुपर जायंट्स संपूर्ण टीम


1. ऋषभ पंत, विकेटकीपर/फलंदाज - 27.00 कोटी 
2. निकोलस पूरन, फलंदाज - 21.00 कोटी  
3. मयंक यादव, गोलंदाज - 11.00 कोटी  
4. रवी बिश्नोई, गोलंदाज - 11.00 कोटी  
5. आवेश खान, गोलंदाज - 9.75 कोटी  
6. आकाश दीप, गोलंदाज – 8.00 कोटी  
7. डेव्हिड मिलर, फलंदाज - 7.50 कोटी
8. अब्दुल समद, अष्टपैलू- 4.20 कोटी
9. आयुष बडोनी, अष्टपैलू- 4.00 कोटी
10. मोहसीन खान, गोलंदाज – 4.00 कोटी 
11. मिचेल मार्श. ऑलराउंडर- 3.40 कोटी
12. शाहबाज अहमद, अष्टपैलू-2.40 कोटी
13. एडन मार्कराम, फलंदाज – 2.00 कोटी
14. मॅथ्यू ब्रिट्झके, फलंदाज - 75 लाख रुपये
15. शमर जोसेफ, गोलंदाज – 75 लाख 
16. मणिमारन सिद्धार्थ, गोलंदाज – 75 लाख रुपये
7. हिम्मत सिंग, बॅटर - 30 लाख
18. अर्शीन कुलकर्णी, अष्टपैलू – 30 लाख रुपये
19. दिग्वेश सिंग, गोलंदाज – 30 लाख रुपये.
20 प्रिन्स यादव, गोलंदाज - 30 लाख 
 21. युवराज चौधरी, अष्टपैलू- 30 लाख
22. आकाश सिंग, गोलंदाज – 30 लाख 
23. राजवर्धन हंगरगेकर, अष्टपैलू- 30 लाख 
24. आर्यन जुयाल, फलंदाज 30 लाख 


इतर महत्वाच्या बातम्या