Tiger 3 : टायगर आणि पठाण आले एकत्र; 'टायगर 3'च्या सेटवरील सलमान आणि शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 02 Jun 2023 04:29 PM
Zara Hatke zara Bachke: कसा आहे सारा आणि विकीचा जरा हटके जरा बचके? चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात...

Zara Hatke zara Bachke: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान  (Sara Ali Khan) 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke zara Bachke) यांचा हा  चित्रपट रिलीज झाला आहे. विकी-साराचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते.  सध्या अनेक नेटकरी या चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर करत आहेत. नेटकऱ्यांना  'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट कसा वाटला? ते जाणून घेऊयात...



Tiger 3 : टायगर आणि पठाण आले एकत्र; 'टायगर 3'च्या सेटवरील सलमान आणि शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल
Tiger 3 : 'टायगर 3' या बहुचर्चित सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा शाहरुख खान आणि सलमान खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Jennifer Lopez New Home: जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेकनं घेतलं आलिशान घर; स्विमिंगपूल, जिम आणि बरंच काही, पाहा काय आहे खास
Jennifer Lopez New Home:  जेनिफर आणि बेन सध्या त्यांनी घेतलेल्या बेव्हरली हिल्स येथील आलिशान घरामुळे चर्चेत आहेत. Read More
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत देशमुखांच्या घरात शिरणार चोर; कांचन आजी कसा करणार संकटाचा सामना?
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात देशमुखांच्या घरी चोर शिरणार आहे. Read More
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात सचिन आणि श्रिया पिळगावकरची हजेरी; उलगडणार बाप-लेकीचे अनोखे नाते
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात सचिन पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर हजेरी लावणार आहेत. Read More
Zara Hatke Zara Bachke Review : मध्यमवर्गीयांना मोठी स्वप्न पाहायला शिकवणारा सारा अली खान आणि विकी कौशलचा 'जरा हटके जरा बचके'!
Zara Hatke Zara Bachke : विकी कौशल आणि सारा अली खानचा 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Naagin 6: तेजस्वी प्रकाशच्या 'नागिन 6' मध्ये ट्वीस्ट; 'या' अभिनेत्याची होणार मालिकेत एन्ट्री
'नागिन 6' मध्ये लवकरच एक ट्वीस्ट येणार आहे. या मालिकेमध्ये  प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. Read More
Dwayne Johnson : ड्वेन जॉनसनचं कमबॅक! 'फास्ट अ‍ॅन्ड फ्युरियस' सिनेमात झळकणार
Dwayne Johnson : ड्वेन जॉनसन लवकरच 'फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमात झळकणार आहे. Read More
Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा मोनिकाला देणार जशास तसे उत्तर; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो पाहिलात?
'तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मंजुळा ही पिहूला लावणी शिकवताना दिसत आहे.  Read More
Anupama : अनुज आणि अनुपमाची अधुरी प्रेमकहाणी; 'अनुपमा' मालिकेचा आजच्या भागात काय पाहायला मिळणार? जाणून घ्या...
Anupama : 'अनुपमा' या मालिकेचा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. Read More
Prasad Khandekar: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरची आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट; म्हणाला, ' तू माझ्यासाठी सोसलेल्या कष्टाची...'
आईच्या वाढदिवसानिमित्त प्रसादनं (Prasad Khandekar) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला त्यानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.  Read More
1920 Horrors Of The Heart Trailer: '1920 हॉरर ऑफ द हार्ट' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
अविका गोर  (Avika Gor) ही '1920- हॉरर ऑफ द हार्ट' (1920 Horrors Of The Heart) या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. Read More
Sankarshan Karhade : चालकाची तब्येत बिघडली, मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे बनला बस ड्रायव्हर, प्रशांत दामले म्हणाले...
Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा नाटकाची बस चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
India Richest Actress: दीपिका, आलिया नाही तर 'ही' आहे भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री; संपत्तीबाबत जाणून घ्या...
भारतातील टॉप-10  श्रीमंत अभिनेत्री कोण आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊयात भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या संपत्तीबाबत... Read More
Varun Tej Engagement : वरुण तेजचा 'या' दिवशी गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठीसोबत होणार साखरपुडा; राम चरण अन् चिरंजीवीची हजेरी
Varun Tej : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीचा लवकरच साखरपुडा होणार आहे. Read More
Asur 2 Review : प्रेक्षकांना भारावणारा 'असुर 2'
Asur 2 Review : प्रेक्षकांना भारावणारी 'असूर 2' ही सीरिज आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Yaar Julahe: 'यार जुलाहे' मध्ये पाकिस्तानी कलाकार करणार गुलजार, मंटो आणि चुगताई यांच्या कथांचे वाचन


Yaar Julahe: महान लेखक गुलजार, सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई आणि अहमद नदीम कासमी यांच्या कथांवर आधारित ‘यार जुलाहे’ ही सीरिज 3 जूनपासून 'जिंदगी' या वाहिनीच्या डीटीएच प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.  या सीरिजमध्ये पाकिस्तानमधील कलाकार विविध लेखकांच्या कथांचे वाचन करताना दिसणार आहेत. 


‘यार जुलाहे’ या सारिजमध्ये माहिरा खान, सरवत गिलानी, निमरा बुचा आणि फैसल कुरेशी हे पाकिस्तानी कलाकार   गुलजार, सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई आणि अहमद नदीम कासमी  या   चारही लेखकांच्या कथा वाचताना दिसतील. यार जुलाहे या सीरिजचे चार भाग जून महिन्याच्या चार वीकेंडला 'जिंदगी' च्या डीटीएच प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जातील. 


Khupte Tithe Gupte : राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना करणार फोन ; ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल


Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड 4 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या  कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  हे उपस्थित राहणार आहे. या एपिसोडमध्ये राज ठाकरे हे त्यांच्या काही आठवणी सांगताना दिसणार आहेत. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहेत की, राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करणार आहेत.  


Alia Bhatt Grandfather Death: आलिया भट्टच्या आजोबांचे निधन


Alia Bhatt Grandfather Death: अभिनेत्री आलिया भट्टचे (Alia Bhatt) आजोबा आणि अभिनेत्री  सोनी राजदान (Soni Razdan) यांचे वडील नरेंद्रनाथ राजदान (Narendranath Razdan) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आलियाचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आलियानं आणि सोनी राजदान यांनी नरेंद्रनाथ यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.