Entertainment News Live Updates टीव्ही ते बॉलिवूड मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 11 Aug 2023 06:03 PM
Khichdi 2 Teaser: खिचडी- 2 चा धमाकेदार टीझर रिलीज; यंदाच्या दिवाळीला फुटणार हास्याचे फटाके,पारेख कुटुंब करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

Khichdi 2 Teaser: लेखक आतीश कपाडिया यांची 'खिचडी' (Khichdi) ही मालिका सप्टेंबर 2002 मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर प्रसारित करण्यात आली होती. कलाकारांची विनोदी शैली आणि कथानक यांमुळे ही मालिका खूप लोकप्रिय झाली. शोमधील पारेख कुटुंबाचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना आवडला. त्यानंतर खिचडी मालिकेतील भूमिकांवर आधारित एक चित्रपट  2010 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव खिचडी हेच होते. आता खिचडी या (Khichdi 2) चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



Gadar 2: सेल्फी काढायला आलेल्या चाहत्यावर भडकला सनी देओल; व्हिडीओ व्हायरल

Sunny Deol Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल  (Sunny Deol)  सध्या त्याच्या गदर-2 (Gadar 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  गदर 2 हा चित्रपट आज (11 ऑगस्ट) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट बघत होते. गदर 2 चित्रपटामध्ये सनीसोबत अभिनेत्री अमिषा पटेल  (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. नुकताच गदर 2 मधील अभिनेता सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो एका चाहत्यावर भडकलेला दिसत आहे.



Rohit Raut : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम रोहित राऊतचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

Rohit Raut : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला रोहित राऊत (Rohit Raut) आता अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी मराठीवरील '36 गुणी जोडी’ (36 Guni Jodi) या मालिकेत त्याची एन्ट्री झाली आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


Rohit Raut : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम रोहित राऊतचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'या' मालिकेत दिसणार

Gadar 2 Movie Review : सनी देओलचा 'गदर 2' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

Sunny Deol Ameesha Patel Gadar 2 Movie Review : बॉलिवूड अभिनेता सनी देओल Sunny Deol) आणि अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा बहुचर्चित सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'गदर 2' हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. तारा सिंह आणि सकिनाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 


Gadar 2 Movie Review : सनी देओलचा 'गदर 2' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

Gadar 2 Twitter Review: कुणी म्हणतंय "ब्लॉकबस्टर" तर कुणी म्हणतंय "टाईमपास"; गदर-2 पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी शेअर केला रिव्ह्यू

Gadar 2 Twitter Review: अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2)  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाचे अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंग केले होते.  हा चित्रपट आज (11 ऑगस्ट) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 'गदर 2' चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर करण्यात सुरुवात केली आहे. जाणून घेऊयात नेटकऱ्यांनी शेअर कलेलेल्या 'गदर 2' चित्रपटाचा रिव्ह्यूबाबत...



Kon Honar Crorepati : शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? Msc. Bed शिक्षिकेनं चक्क लाईफलाईन घेतली

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Hanar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होत असतात. आता नुकत्याच पार पडलेल्या भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विचारण्यात आलेल्या एका सोप्या प्रश्नाचे उत्तर शिक्षिका देऊ शकलेली नाही.





Shehnai : स्वतंत्र भारतात प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा 'शहनाई'; त्या काळातही बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

Independent India’s First Film Shehnai : 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताचा उत्सव साजरा करण्यासाठी बॉलिवूडनेही या दिवशी 'शहनाई' (Shehnai) हा सिनेमा प्रदर्शित केला. खरे तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रदर्शित झालेला 'शहनाई' हा पहिलाच सिनेमा. त्यामुळे या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरला.


Shehnai : स्वतंत्र भारतात प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा 'शहनाई'; त्या काळातही बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

12th Fail Teaser Release: '12 वी फेल' चा टीझर रिलीज; 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

12th Fail Teaser Release: विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) आणि झी स्टुडिओजने यांच्या 12 वी फेल (12th Fail) या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. हा टीझर गदर 2 (Gadar 2) चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट अनुराग पाठक यांच्या याच नावाच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबरीवर आधारित आहे.



OMG 2 Movie Review : लैंगिक शिक्षणावर प्रकाश टाकणारा 'ओएमजी 2'

OMG 2 Movie Review : विद्यार्थांना लैगिंक शिक्षणासंदर्भात माहिती देणं गरजेचं आहे का? यावर भाष्य करणारा अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हा सिनेमा आहे. 'ओएमजी 2' या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


OMG 2 Movie Review : लैंगिक शिक्षणावर प्रकाश टाकणारा 'ओएमजी 2'

Jailer Box office Collection : रजनीकांतच्या 'जेलर'ने पहिल्याच दिवशी केली दणदणीत कमाई

Rajinikanth Jailer Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्याच्या 'जेलर'  (Jailer) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 10 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. रजनीकांतचा मोठा चाहतावर्ग असून ते त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता सिनेमा प्रदर्शित झाल्याने त्यांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली आहेत.


Jailer Box office Collection : रजनीकांतच्या 'जेलर'ने पहिल्याच दिवशी केली दणदणीत कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा फक्त महिलांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा : राज ठाकरे

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे. 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरील सत्ता गाजवत आहेच परंतु आता प्रतिष्ठीत व्यक्तिमत्वांनीही या सिनेमाचं भरभरुन कौतुक केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील हा सिनेमा पाहिला असून 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा फक्त महिलांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा फक्त महिलांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा : राज ठाकरे

Shah Rukh Khan : "मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे"; चाहत्याचा प्रश्न पाहून शाहरुख म्हणाला...

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता आगामी सिनेमाचं पोस्टर आऊट करत किंग खानने 'आस्क एसआरके' (Ask Srk) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला आहे. या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या भन्नाट प्रश्नांची त्याच्या हटके अंदाजात उत्तरे दिली आहेत.


Shah Rukh Khan : "मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे"; चाहत्याचा प्रश्न पाहून शाहरुख म्हणाला...

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Gadar 2 : ओपनिंग दिवशी 'गदर 2' करणार मोठी कमाई! पहिल्याच दिवशी तोडणार 'पठाण'चे रेकॉर्ड?


Gadar 2 First Day Collection Prediction: सनी देवोलचा बहुचर्चित 'गदर 2' (Gadar 2) हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून हा चित्रपट बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल असा विश्वास त्याच्या निर्मात्यांना आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झाल्यानंतर त्याच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 100 ते 110 कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'गदर 2' हा चित्रपट या वर्षीचा सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजपासून ते अॅडव्हान्स बुकिंगपर्यंत 'गदर 2' चा धमाका पाहायला मिळत आहे. 9 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत 'गदर 2'साठी 3,91,975 तिकिटांची आगाऊ बुकिंग झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठी अपेक्षा आहे.


Subhedar Trailer: 'सुभेदार' चित्रपटाच्या ट्रेलरला दोन दिवसात दोन मिलियपेक्षा अधिक व्ह्यूज; चिन्मय मांडलेकरनं शेअर केली खास पोस्ट


Subhedar Trailer:  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांचा  'सुभेदार' (Subhedar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुभेदार या चित्रपटाची टीम सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. दोन दिवसांपूर्वी सुभेदार या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. दोन दिवसात या ट्रेलरला दोन मिलियपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. याबाबत नुकतीच अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यानं एक खास पोस्ट शेअर केली आहे.


Film On Seema Haider And Sachin: रुपेरी पडद्यावर उलगडणार सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी; ‘कराची टू नोएडा’ च्या ऑडिशनला सुरुवात, व्हिडीओ व्हायरल


Film On Seema Haider And Sachin: पाकिस्तानची   सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन  (Sachin Meena) हे  जोडपे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या दोघांची लव्ह स्टोरी आता प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे.  ‘कराची टू नोएडा’  या चित्रपटात  सीमा हैदर आणि सचिन यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘कराची टू नोएडा’ (Karachi to Noida Movie)   या चित्रपटाच्या ऑडिशनला सुरुवात झाली आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.