एक्स्प्लोर

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा फक्त महिलांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा : राज ठाकरे

Baipan Bhaari Deva : बाईपण भारी देवा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सत्ता गाजवत असून आता राज ठाकरेंनीदेखील हा सिनेमा पाहिला आहे.

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे. 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरील सत्ता गाजवत आहेच परंतु आता प्रतिष्ठीत व्यक्तिमत्वांनीही या सिनेमाचं भरभरुन कौतुक केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील हा सिनेमा पाहिला असून 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा फक्त महिलांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

'बाईपण भारी देवा' या सिनेमाबद्दल बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray On Baipan Bhaari Deva) म्हणाले,"बाईपण भारी देवा' हा सिनेमा स्त्रिया पाहत आहेतच पण पुरुषांनीही पहावा असा हा सिनेमा आहे. आपल्या माता, भगिनी कोणत्या कोणत्या परिस्थितीतून जातात ते समजण्याची ही गरज आहे. सिनेमा पाहिल्यावर महिला स्वतःला रिलेट तर करतातच, परंतू पुरुषांनीही आपल्या रोजच्या जीवनात जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या काढून टाकणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच बाईपणच्या कथानकाचं खरं यश हे आहे". 

View this post on Instagram
 
A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

'बाईपण भारी देवा' या सिनेमात कलाकारांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट कथानक, सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी सिनेमाने, इतर अनेक सिनेमांना मागे टाकत, आपला जोरदार ठसा उमटवला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर सध्या 'बाईपण भारी देवा' या मराठी सिनेमाचा बोलबाला आहे.

आजपासून फक्त 100 रुपयांत पाहता येणार 'बाईपण भारी देवा'

'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva Special Offer) हा सिनेमा आजपासून फक्त 100 रुपयांत पाहता येणार आहे. केदार शिंदेंनी एक खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"हा सिनेमा "तीने" डोक्यावर घेतला. पण खरतर मी तो पुरूषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तीचं मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही!! आता मात्र तीचा मान सन्मान राखा. या शुक्रवार पासून ही बंपर ॲाफर समस्त पुरूष वर्गाला!! चांगला सिनेमा तुमची थिएटर मध्ये वाट पाहतोय... फक्त 100 रुपयांत".

'बाईपण भारी देवा' हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमात वंदना गुप्ते (Vandana Gupte), रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalakar), सुकन्या मोने (Sukanya Mone) आणि दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत आहेत.

संबंधित बातम्या

Baipan Bhaari Deva: 100 पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिला 'बाईपण भारी देवा'; केदार शिंदे म्हणाले, 'सिनेमा संपल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaSantosh Deshmukh Case : देशमुख हत्या प्रकरणात 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब ठरले महत्त्वाचेABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : Maharashtra News : 08 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : 08 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Embed widget