Entertainment News Live Updates: सॅम बहादुर चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Nitin Gadkari: भारताचे हायवेमॅन अर्थात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर आधारित असणारा 'गडकरी' (Gadkari Marathi Movie) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर आणि या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. 'गडकरी' चित्रपटात कोणता अभिनेता नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. नुकतेच गडकरी या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा दिसत आहे.
Vanita Kharat : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवते. लवकरच वनिता ही 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील वनिताच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Sam Bahadur Teaser Out: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये विकीचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. सॅम बहादुर या चित्रपटाच्या टीझरमधील विकीचा लूक, विकीची नजर आणि त्याचे डायलॉग्स या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. सॅम बहादुर या चित्रपटामध्ये विकीनं सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) यांची भूमिका साकारली आहे.
पाहा टीझर
Sam Bahadur Teaser Out: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये विकीचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. सॅम बहादुर या चित्रपटाच्या टीझरमधील विकीचा लूक, विकीची नजर आणि त्याचे डायलॉग्स या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. सॅम बहादुर या चित्रपटामध्ये विकीनं सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) यांची भूमिका साकारली आहे.
पाहा टीझर
National Cinema Day 2023: आज देशात राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day 2023) साजरा केला जात आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त सिनेप्रेमींसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. प्रेक्षक आज थिएटरमध्ये 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त आज कोणकोणते चित्रपट तुम्ही 99 रुपयांमध्ये थिएटरमध्ये जाऊन पाहू शकता? याबाबत जाणून घेऊयात...
World Cup 2023: भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामना (IND vs PAK) शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विश्वचषक 2023 (World Cup 2023) च्या 12 व्या सामन्यापूर्वी एका ग्रँड सेरेमनीचे आयोजन करण्यात आले आहे. या सेरेमनीमध्ये काही गायक परफॉर्म करणार आहेत. याबाबत बीसीसीआयनं (BCCI) ट्विटरवर माहिती दिली आहे.
Bhairavi Vaidya: प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya) यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जवळपास, 45 वर्ष त्या मनोरंजनक्षेत्रात काम करत होत्या. भैरवी या गेल्या सहा महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. भैरवी वैद्य यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Tumbbad: "हस्तर" म्हणलं तरी आजही येतो अंगावर काटा; 'तुंबाड' ची पाच वर्षे, सिनेमातील प्रत्येक फ्रेम लक्ष वेधून घेणारी!
Tumbbad: काही चित्रपट असे असतात ज्यांचे मनात एक वेगळे स्थान असते. त्या चित्रपटांचे नाव जरी घेतलं तर डोळ्यासमोर पूर्ण चित्रपट उभा राहतो. असाच तुंबाड (Tumbbad) हा चित्रपट 12 ऑक्टोबर 2018 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाला रिलीज होऊन आज पाच वर्ष झाली आहेत. या चित्रपटाची एक-एक फ्रेम अनेकांच्या आजही लक्षात आहे. चित्रपटाची cinematography, चित्रपटाचे कथानक, चित्रपटातील कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तुंबड या चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं चित्रपटाचा दिग्दर्शक राही बर्वेनं (Rahi Anil Barve) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Sundara Manamadhe Bharli: “सुंदरा मनामध्ये भरली" साठी किती मानधन मिळालं? नेटकऱ्याचा प्रश्न; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली...
Sundara Manamadhe Bharli: सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli) या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेमधील लतिका आणि अभिमन्यु या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री अदिती द्रविडने (Aditi Dravid) या मालिकेमध्ये नंदिनी ही भूमिका साकारली. अदितीनं नुकतेच इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. या सेशनमध्ये अदितीनं नेटकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. अदितीनं चाहत्यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Madhuri Pawar: "पुढच्या प्रवासात तुझ्याशिवाय जगायची सवय कशी करून घेऊ?"; भावाच्या निधनानंतर माधुरी पवारची भावूक पोस्ट
Madhuri Pawar: अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माधुरीचा अक्षय याचं 12 दिवसांपूर्वी निधन झाले आहे. भावाच्या निधनानंतर माधुरीनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. माधुरीनं या पोस्टच्या माध्यमातून भावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच माधुरीनं या पोस्टमधून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -