(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brahmastra Collection : जगभरात 'ब्रह्मास्त्र'चा डंका! पहिल्याच दिवशी केली 75 कोटींची कमाई; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
Brahmastra Box Office Collection Day 1 : अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.
Brahmastra Box Office Collection Day 1 : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांची कमाई फारशी कौतुकास्पद नव्हती. मात्र, आता याला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट अपवाद ठरला आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपट काल (9 सप्टेंबर) रोजी रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पहिल्याच दिवशी, जिथे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 37 कोटींची कमाई करून दमदार सुरुवात केली आहे. तिथे या चित्रपटाने जगभरातूनही जबरदस्त कमाई केली आहे.
जगभरात 'ब्रह्मास्त्र'चा डंका :
'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीपासून (Ayan Mukerji) ते 'ब्रह्मास्त्र'च्या स्टारकास्टपर्यंतच्या सगळ्यांच्याच मेहनतीला यश आल्याचे दिसते आहे. पहिल्या दिवशीची कमाई पाहता या चित्रपटाने इतिहास रचल्याचे दिसते आहे. या चित्रपटाने जगभरात 75 कोटींची कमाई केली आहे. बऱ्याच कालावधीनंतर एका चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई करून दमदार कमाईला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. जे खरोखरच कौतुकास्पद आहे. अयान मुखर्जीने सोशल मीडियावर चित्रपटाची वर्ल्ड वाइड फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिस कलेक्शन :
अयान मुखर्जीने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'कृतज्ञता, उत्साह, आशा.. आपली चित्रपट-संस्कृती जिवंत आणि गतिमान ठेवत, ब्रह्मास्त्र अनुभवण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गेलेल्या सर्वांचे खूप खूप आभार. पुढील काही दिवसांची आणखी प्रतीक्षा आहे.
'ब्रह्मास्त्र' बद्दल बरीच चर्चा झाली. चित्रपटाचा ट्रेलर आणि उत्तम गाण्यांनी प्रेक्षकांचा उत्साह वाढवला होता. त्याचबरोबर चित्रपटाच्या स्टारकास्टनेही प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्टसोबत अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन यांसारखे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुख खानही छोट्या भूमिकेत दिसणार आहे. ओपनिंग डेच्या बंपर कमाईने आता निर्मात्यांमध्ये आणखी आशा निर्माण केल्या आहेत. आता या वीकेंड चित्रपटाचे कलेक्शन काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :