एक्स्प्लोर

Brahmastra Review : उत्कृष्ट व्हीएफएक्स पण कंटाळवाणे सादरीकरण

Brahmastra Review  : ब्रह्मास्त्र चित्रपटाचे व्हीएफएक्स कमालीचे आहेत. अगदी हॉलिवूडच्या तोडीचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण बंदिस्त पटकथा नसल्याने चित्रपट स्वैरपणे फिरत राहातो.

Brahmastra Review  : हॉलिवूडच्या अॅव्हेंजर किंवा सुपरहिरो चित्रपटांप्रमाणे अयान मुखर्जीने अॅस्ट्राव्हर्स त्रिधारा निर्माण करण्याचा संकल्प सोडलाय. अनेक वर्ष तो या चित्रपटावर काम करीत होता. मात्र चित्रपट पाहाताना त्याने नक्की काय काम केले असा प्रश्न पडतो. चित्रपटाची कथा तशी बघायला गेलो तर खूप चांगली आहे, पण बंदिस्त पटकथा नसल्याने चित्रपट स्वैरपणे फिरत राहातो आणि मध्ये-मध्ये मूळ वळणावर येतो. हे पटकथेबरोबरच दिग्दर्शक म्हणून अयान मुखर्जीचे अपयश आहे.

चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्यासोबत शाहरुख खान आणि नागार्जुनही पाहुणे कलाकार म्हणून दिसतात. रणबीरने शिवाची भूमिका नेहमीप्रमाणेच चांगल्या प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न केलाय. आलियाला तसे पाहायला गेले तर काहीच काम नाही. फक्त नायकाला नायिका हवी म्हणून ती आहे. चित्रपटात अनेक प्रश्न अर्धवट सोडलेत. अर्थात या चित्रपटाचे आणखी दोन भाग येणार असल्याने त्यात आलियाची किंवा अन्य प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न अयान करणार असेल.

हुसेन दलाल यांचे संवाद जराही प्रभावित करीत नाहीत. तसेच संगीतकार प्रीतमने गीतांवर मनापासून काम केलेले दिसून आले नाही. प्रीतमच्या संगीतापेक्षा सायमन फ्रॅन्ग्लेनचे पार्श्वसंगीत खूपच चांगले आहे. विदेशी तंत्रज्ञ चांगले काम करतात यात शंका नाही. असेच काम डीनेग नावाच्या एका विदेशी कंपनीने व्हीएफएक्सवर केलेले आहे. त्यामुळे व्हीएफएक्स खूपच चांगले झालेले आहेत. याच कंपनीने ड्यून या हॉलिवूडच्या चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम केलेले आहे.

एकूणच करण जोहर, रणबीर कपूर, अयान मुखर्जी द्वारा निर्मित पावणे तीन तासांचा हा चित्रपट गाणी आणि मध्ये-मध्ये भरकटल्यामुळे मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरलाय. जर अयान आणि कंपनीने चित्रपटातील गाणी काढून आणखी चांगल्या पद्धतीने एडिट करून दोन तासात बसवला असता तर मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडला असता यात शंका नाही.

अडीच स्टार. दीड स्टार व्हीएफएक्ससाठी आणि एक स्टार निर्मात्यांच्या धाडसासाठी. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie :  हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vidarbha Voting : विदर्भात किती टक्के मतदान झालं, पाहा व्हिडिओ... ABP MajhaSupriya Sule Baramati Loksabha : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळABP MajhaVidarbha 1 Phase Election : विदर्भातील 5 मतदारसंघात 54.85 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान गडचिरोलीतChhagan Bhujbal On Nashik News : नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार, गोडसे हेच उमेदवार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie :  हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
Nashik Loksabha : भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
Preity Zinta : 'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?
'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
Embed widget