Oscars 2025 Nominations List: 'एमिलिया पेरेज'ला सर्वाधिक 13 नॉमिनेशन्स, हिंदी फिल्म 'अनुजा'ही ऑस्करच्या शर्यतीत, कोण मारणार बाजी?
Oscars 2025 Nominations List: ऑस्कर 2025 ची सुरुवात नामांकनांनी झाली आहे. आधी त्याची घोषणा 17 जानेवारी रोजी होणार होती, पण, लॉस एंजेलिसमधील भीषण आगीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. असंही म्हटलं जात होतं की, 97 वर्षांत प्रथमच ऑस्कर रद्द होऊ शकतो...
Oscars 2025 Nominations List: 97 व्या अकादमी पुरस्कारांसाठी नॉमिनेशन्स गुरुवारी जाहीर करण्यात आले. ऑस्करचे नॉमिनेशन्स जाहीर झाले आणि हा दिवस 'एमिलिया पेरेझ', 'द ब्रुटालिस्ट' आणि 'विक्ड' साठी एक मोठा दिवस ठरला. गुरुवारी सकाळी (भारतात संध्याकाळी 7 वाजता) बोवेन यांग आणि राहेल सेनॉट यांनी चित्रपट उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी नॉमिनेशन्सची घोषणा केली. 'एमिलिया पेरेझ' सर्वाधिक 13 नॉमिनेशन्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर, 'द ब्रुटालिस्ट' आणि चित्रपट संगीत 'विकेड' 10-10 नॉमिनेशन्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत. भारतासाठी आनंदाची बातमी आहे की 'अनुजा' ने लाईव्ह अॅक्शन शॉर्ट मूव्ही कॅटेगरीत आपलं स्थान निर्माण केलं.
ऑस्कर नॉमिनेशन्समध्ये हिंदी भाषेतील 'अनुजा'ची मजल
अॅडम जे. ग्रेव्हज दिग्दर्शित आणि सुचित्रा मत्ताई निर्मित 'अनुजा' बद्दल बोलताना, 'अनुजा' (Anuja) ही दोन बहिणींची एक प्रेरणादायी कथा आहे, ज्या त्यांचं शोषण आणि त्यांना वगळण्याच्या प्रयत्नात असलेल्या जगात आनंद आणि संधी शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रियांका चोप्रा जोनास, अनिता भाटिया, गुनीत मोंगा आणि मिंडी कलिंग हे कार्यकारी निर्माते आहेत. आता 'अनुजा' भारतातही स्ट्रीमिंगसाठी तयार आहे. ही एक अमेरिकन हिंदी लँग्वेज शॉर्ट फिल्म आहे, जी अॅडम जे. ग्रेव्हज यांनी लिहिली आहे. ही फिल्म बालकामगार आणि मुलींच्या शिक्षणावर प्रकाश टाकते. काही दिवसांत हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे.
Sound off in the comments with your final #Oscars nominations predictions.
— The Academy (@TheAcademy) January 22, 2025
Join us tomorrow, January 23rd, at 8:30 AM ET / 5:30 AM PT to see who is headed to the 97th Oscars. Stream on https://t.co/8Zw5mDf3tg, https://t.co/5fKuh0mVRV, ABC, Hulu, Disney+ or the Academy’s TikTok,… pic.twitter.com/iYoCEfNYPM
ऑस्कर जिंकण्याच्या शर्यतीत निवडलेल्या चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो. नॉमिनेशन्स इथे पाहा...
बेस्ट पिक्चर
Anora
The Brutalist
A Complete Unknown
Conclave
Dune: Part Two
Emilia Pérez
I m Still Here
Nickel Boys
The Substance
Wicked
बेस्ट अॅक्टर
Adrien Brody, The Brutalist
Timothee Chalamet, A Complete Unknown
Colman Domingo, Sing Sing
Ralphe Feines, Conclave
Sebastian Stan, The Apprentice
बेस्ट अॅक्ट्रेस
Cynthia Erivo, Wicked
Karla Sofía Gascon, Emilia Pérez
Mikey Madison, Anora
Demi Moore, The Substance
Fernanda Torres, I m Still Her
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर
Yura Borisov, “Anora”
Kieran Culkin, “A Real Pain”
Edward Norton, “A Complete Unknown”
Guy Pearce, “The Brutalist”
Jeremy Strong, “The Apprentice”
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस
Monika Barbara, “A Complete Unknown”
Ariana Grande, “Wicked”
Felicity Jones, “The Brutalist”
Isabella Rossellini, “Conclave”
Zoe Saldaña, “Emilia Pérez”
बेस्ट डायरेक्टर
Sean Baker, 'Anora'
Brady Corbet, 'The Brutalist'
James Mangold, 'A Complete Unknown'
Jacques Audiard, 'Emilia Perez'
Coralie Fargeat, 'The Substance'
बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म
I m Still Here
The Girl with the Needle
Emilia Pérez
The Seed of the Sacred Fig
Flow
बेस्ट कॉस्ट्यूम डिझाइन
बेस्ट एडेप्टेड स्क्रीनप्ले
A Complete Unknown
Conclave
Emilia Perez
Nickel Boys
Sing Sing
बेस्ट ऑरिजनल स्क्रीनप्ले
Anora
The Brutalist
A Real Pain
September 5
The Substance
बेस्ट लाइव एक्शन शॉर्ट फिल्म
Alien
Anuja
I m Not a Robot
The Last Ranger
A Man Who Would Not Remain Silent
महत्त्वाच्या इतर बातम्या :