Radhika Aapte: राधिका आपटेकडे गुडन्यूज! 12 वर्षांनंतर आई होणार, सोशल मिडियावर पोस्ट केले फोटो, चाहत्यांना सुखद धक्का
राधिका आपटेनं शेअर केलेल्या पोस्ट मध्ये ती गरोदर असल्याचं कळाल्यानं तिच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे. या पोस्टवर अनेक कलाकारांसह राधिकाच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Radhika Aapte: बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे लग्नानंतर १२ वर्षांनी आई होणार आहे. बीएफआय लंडन फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. यावेळी काढलेले फोटो शेअर केलेत. यावेळी तिनं गरोदर असल्याचा कोणताही उल्लेख केला नसला तरी रेड कार्पेटवर पोज दिलेल्या फोटोमध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी राधिका आई होणार आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.तिच्या पोस्टमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला असून ३९ व्या वर्षी राधिका बाळाला जन्म देणार आहे. लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाच्या प्रिमियरला ती उपस्थती राहिली होती. राधिका काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसून आली.
काय पोस्ट केली आहे राधिकानं?
हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्या बोल्ड आणि दमदार भूमिकांनी पाहणाऱ्याचं लक्ष आपल्या अभिनयात आणि सादर करणाऱ्या गोष्टीत खेचणारी अभिनेत्री म्हणून राधिका आपटेची ओळख आहे. नुकतेच लंडन फिल्म फेस्टिवलच्या प्रमियरला हजेरी लावत तिनं काही फोटो पोस्ट केले आहेत. त्याखाली तिनं ‘सिस्टर मिडनाइट यूके प्रीमियर’ असं कॅप्शन दिलं आहे. ही पोस्ट सध्या तिच्या प्रेग्नंसी लूक मुळं चांगलीच चर्चेत आहे. राधिका आपटेचा ‘सिस्टर मिडनाइट’ ही एका निराश आणि दुराग्रही नवविवाहित दाम्पत्याची कथा आहे. या कथेत दोघांचं आयुष्य एका अशा वळणावर येतं, जिथे अनेक गोष्टी अचानक बदलून जातात.
View this post on Instagram
राधिकाच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव
राधिका आपटेनं शेअर केलेल्या पोस्ट मध्ये ती गरोदर असल्याचं कळाल्यानं तिच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे. या पोस्टवर अनेक कलाकारांसह राधिकाच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राधिकानं २०१२ साली बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. २०११मध्ये राधिका नृत्य शिकण्यासाठी लंडनमध्ये गेली होती आणि त्यानंतर दोघांची मैत्री झाली. यानंतर दोघे एकत्र राहू लागले. २०१३मध्ये अधिकृत समारंभापूर्वी २०१२मध्ये त्यांचे छोटेखानी लग्न झाले होते. आता १२ वर्षांनी आईबाबा होणार आहेत. यावेळी राधिकाने ब्लॅक, ऑफ शोल्डर मिडी ड्रेस परिधान केला होता आणि केस बनमध्ये बांधले होते. हे फोटो समोर येताच अभिनेत्रीवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
हेही वाचा:
Nathani Pahije Song : नाकातील नथीची रोमँटिक अन् आगळीवेगळी कथा, 'नथनी पाहिजे'गाणं ट्रेंडिंगवर