Bigg boss 18: श्रुतिकाच्या नवऱ्यासोबत बिग बॉस जाणार बँकॉकला! कन्फेशन रूममध्ये नक्की झालं काय?
बिग बॉसला तमिळमध्ये बोलण्यास शिकवत तिने या प्रोमो मध्येच धमाल उडवून दिली आहे
Bigg Boss 18: बिग बॉस 18 हा रियालिटी शो सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्नसने भरलेला आहे. कलर्स टीव्हीने नुकताच एक मजेशीर प्रोमो पोस्ट केला आहे. यात श्रुतिकाला कन्फेशन रूममध्ये बोलवत तिच्या बँकॉकमध्ये असणाऱ्या नवऱ्याला काय निरोप द्यायचा आहे असं ते विचारतात. तेव्हा श्रुतीकाही त्यांना मजेशीर उत्तर देत खुद्द बिग बॉसलाच तमिळमध्ये बोलायला भाग पडते.
नक्की कन्फेशन रुममध्ये काय झाले?
बिग बॉस घरातील कोणत्या ना कोणत्या स्पर्धकास कन्फेशन रूम मध्ये बोलवून त्याच्याशी विचारपूस करत असतात. अशातच कलर टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमो मध्ये श्रुतिकाला बिग बॉस ने कन्फेशन रूममध्ये बोलावले होते. त्यावेळी त्यांच्या पती अर्जुनने कॉल करत त्यांना थायलंडच्या ट्रीपमध्ये कंपनी देण्याचे विचारलाच त्यांनी सांगितले. त्यावर श्रुतिकाने सांगितले, बिग बॉस माझी बारा वर्षांची ट्रेनिंग आहे. ती अशी दोन आठवड्यात जाणार नाही. मी वापस आल्याशिवाय शहर सोडून जायचं नाही असं तिने बिग बॉसला तमिळ बोलत निरोप द्यायला सांगितला.
तमिळमध्ये बोलायला लावत श्रुतिकानं आणली मजा
बिग बॉसला तमिळमध्ये बोलण्यास शिकवत तिने या प्रोमो मध्येच धमाल उडवून दिली आहे. तुम्हाला माहित नाही का बँकॉक मध्ये काय काय असतं असं म्हणत सँडविच मसाज बॉडी मसाज सगळं तिथे खूप स्वस्त मिळतं असं ती म्हणाली. पण तिथे तुम्ही एकटे जाऊ शकत नाही असं म्हणत तिच्या नवऱ्यासाठी तमिळमध्ये बिग बॉस ने निरोप द्यावा असं तिने सांगितलं.
बिगबॉसच्या 18 सिझनमध्ये भांडणं चर्चेचा विषय
बिग बॉस सीझन 18 ला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील राड्यामुळे बिग बॉस प्रेमींचं चांगलं मनोरंजन होताना दिसत आहे. बिग बॉस 18 च्या घरातील सदस्यांन दररोज नवनवीन समस्यांना सामोरं जावं लागत आहे, त्यासोबत सदस्यांचे एकमेकांसोबत वाद होताना दिसत आहे. क्षुल्लक कारणावरुन सुरु होणाऱ्या वादामुळे सदस्यांसोबत जोरदार खटके उडताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात अविनाश मिश्राचं दररोज कोणत्या न कोणत्या सदस्यांबरोबर भांडण होताना दिसत आहे. सध्या अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा याचं भांडण चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
हेही वाचा: