एपिसोडमागे 3.5 कोटीची ऑफर असताना बिगबॉसच्या ऑफरला या 70च्या सुपरस्टारनं धुडकावलं पण..
सलमान खान होस्ट असणाऱ्या बिगबॉसच्या नव्या शोची सगळीकडे सध्या जोरदार चर्चा असून या शोमध्ये कोणते कलाकार असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Big Boss: सलमान खान होस्ट असणाऱ्या हिंदी टेलीव्हिजन इंडस्ट्रीतील वादग्रस्त बिग बॉस शोची सध्या सगळीकडे चर्चा आहे. 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून कोणते कलाकार असतील याची चर्चा असून अनेकांची नावे समोर येत आहेत. बिग बॉसची निर्माते या शोला रंजक बनवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. त्याने तारक मेहता का उलटा चष्मा फेम अभिनेत्री दिशा वकाणी या अभिनेत्रीसह अनेक बड्या कलाकारांना या शोमध्ये येण्यासाठी भरपूर पैशांची ऑफर देण्यात आली आहे. पण तुम्हाला माहित आहे का निर्मात्यांनी एकदा सत्तरीतील अभिनेते राजेश खन्ना यांनाही या शोची ऑफर देण्यात आली होती.
बिग बॉसची ऑफर राजेश खन्नांना
आपल्या करियच्या ग्राफवर काहीसे खाली असताना बॉलिवूडचे सत्तरीतील सुपरस्टार राजेश खन्ना यांना निर्मात्यांनी बिग बॉसची ऑफर दिली होती. २०१२ मध्ये रिडिफमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, या शोमध्ये सहभागी होण्यासाठी राजेश खन्ना यांना प्रत्येक एपीसोडसाठी 3.5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण ही ऑफर राजेश खन्नांनी नाकारली होती.
आधी राजेश खन्नांचा नकार मग शोनेही म्हटले नको...
राजेश खन्ना यांना बिग बॉसच्या प्रत्येक एपिसोडसाठी ३.५ कोटी रुपयांची ऑफर होती. यासाठी या शोच्या निर्मात्यांनी राजेश खन्ना यांना शो मध्ये घेण्यासाठी एक बैठक घेतली होती. यामध्ये ही ऑफर राजेश खन्नांच्या समोर ठेवण्यात आली होती. पण बिग बॉसमध्ये येण्यासाठी राजेश खन्ना यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर काही दिवसांनही राजेश खन्ना यांनी बिग बॉसमध्ये येण्याचा विचार केला परंतू त्यावेळी निर्मात्यांनी रस दाखवला नाही. राजेश खन्ना यांनी आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनयाने चाहत्यांना खूप प्रभावित केले होते. त्याने बॅक टू बॅक 17 हिट चित्रपट दिले. मात्र, यश पाहिल्यानंतर राजेश खन्ना यांच्या करिअरचा आलेख खाली घसरू लागला.