(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ankita Walavalkar: 'बाबा पहिल्यांदा मुंबईत आले तो क्षण..' अंकितानं शेअर केला Big Boss साठी वडिलांच्या मुंबई प्रवासाचा हळवा क्षण
तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. अंकिता आणि तिच्या वडिलांच्या नात्यावरही नेतकर्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
Ankita Walavalkar: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात मालवणी बोलत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली कोकण हार्टटेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर सध्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घोषणेमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरात असताना खेळाच्या अंतिम टप्प्याच्या वेळी अंकिताचे बाबा तिला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात आले होते. आयुष्यात पहिल्यांदाच ते मुंबईत आल्याचं सांगत अंकितानं instagram वर एक भावूक पोस्ट केली आहे. बाबा मुंबईत आलेला क्षण मी कधीही विसरू शकत नाही. असं सांगत तिने तिच्या वडिलांच्या मुंबईच्या पहिल्या क्षणाविषयी पोस्ट केली आहे.
तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. अंकिता आणि तिच्या वडिलांच्या नात्यावरही नेतकर्यांनी कमेंट्स केल्या आहेत. यापेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही... बाबा डोळ्यात पाणी आलं भाग्यवान अंकिता... चिडू नसला तरी जावयान फिरवल्यानंतर.. अशा कितीतरी कमेंट्स या पोस्टखाली चाहत्यांनी केल्यात.
मी त्यांच्यासोबत नव्हते पण...
बाबा मुंबईत आले त्या क्षणी मी त्यांच्यासोबत नव्हते. पण मुंबई थोडी फार.. एका दिवसात जमेल तितकी पाहिली. आणि नंतर ते बिग बॉसच्या घरात आले. खरंच हा क्षण मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. बिग बॉसच्या घरात बाबा आले ही गोष्ट आश्चर्याची तर होतीच. पण बाहेर राहून मला वोट करणं, वोट मिळतायेत की नाही यासाठी प्रयत्न बाबा करत होते. ही सुद्धा मोठी आश्चर्याची बाब होती. स्पर्धा परीक्षेच्या वेळी आपली मुलगी यशस्वी व्हावी म्हणून बाबांनी केलेले प्रयत्न मला आठवले. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी हे दिवस बघतेय.. असं म्हणत अंकिताने instagram अकाउंट वरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात वडिलांना पाहून अंकिता रडलीच..
बिग बॉसच्या घरात 70 दिवस काढणं ही मोठी कठीण गोष्ट समजली जाते. कुटुंबापासून दूर, अनोळखी लोकांमध्ये आपला गेम दाखवत मानसिक बळाची कसोटी पाहणाऱ्या या शोमध्ये शेवटी शेवटी आपल्या कुटुंबाची गाठ पडणं वेगळच बळ देऊन जाणार ठरतं. अंकिता वालावलकर हिला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात तिचे बाबा आले होते तेव्हा वडिलांना अचानक पाहून आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का बसल्याने अंकिता भवूक झाली होती. बिग बॉसनेही तिच्या वडिलांच्या मुंबईच्या पहिल्या प्रवासाविषयी सांगितलं होतं. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वडिलांच्या भेटीचा तो व्हिडिओ जोडत तिनं हळवा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
हेही वाचा: