Big Boss 18: बिग बॉसच्या घरात वहबिझ दोराबजी-करम राजपाल वाइल्डकार्ड एन्ट्री घेणार? सात दिवसांतच Vivian Dsena चा भूतकाळ झोप उडवणार
ग्रँड प्रीमियरच्या त्याच दिवशी निर्मात्यांनी Vivian ला टॉप 2 बनवले. आता तो सुरुवातीपासूनच शोचा फायनलिस्ट आहे .मात्र, यामागे काय खेळ आहे, हे 3 महिन्यांत स्पष्ट होईल.
bigboss 18: बिगबॉस सिझन १८ ला सुरु होऊन अवघे तीनच दिवस झाले आहेत. पहिल्या विकेंडचा टास्कही अजून संपला नाही की तत्पूर्वीच बिगबॉसच्या घरात येणाऱ्या वाईल्डकार्ड एन्ट्रीची चर्चा सुरु झाली आहे. यात सध्या फायनलिस्ट दोन नावंही जाहीर करण्यात आली आहेत. यात टॉप २ मध्ये विवियन डिसेनाची माजी पत्नी आणि अभिनेत्री वहबिज दोराबजी येऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. ईटाईम्सनं सुत्रांचा हवाला देत असं म्हटलंय की वाहबिज दोराबजी आणि करम राजपाल या दोघांची बिगबॉसच्या घरात एन्ट्री लवकरच होऊ शकते.
बिग बॉस १८ मध्ये होणार वाइल्डकार्ड एन्ट्री
बिग बॉस शोला अजून आठवडाही उलटलेला नसला तरी सध्या या शोमध्ये दोन जणांची वाइल्डकार्ड एन्ट्री होणार असल्याचं समोर येतंय. कदाचित काही काळासाठी ही योजना असावी असे समजते. ज्यामध्ये निर्माते विवियनच्या भूतकाळाला शोचा भाग बनवण्याचा विचार करत असतील. असं सांगण्यात येतंय.
व्हिव्हियन डिसेना 'बिग बॉस 18' मधील टॉप 2
ग्रँड प्रीमियरच्या त्याच दिवशी निर्मात्यांनी Vivian Dsena ला टॉप 2 बनवले. आता तो सुरुवातीपासूनच शोचा फायनलिस्ट आहे आणि हे स्थान दुसरे कोणी घेऊ शकत नाही. मात्र, यामागे काय खेळ आहे, हे तीन महिन्यांत स्पष्ट होईल. अशा परिस्थितीत कोण खरे आणि किती खरे, हे येणारा काळच समजेल. मधुबाला एक इश्क एक जुनून आणि शक्ती अस्तित्व के एहसास की यांसारख्या लोकप्रिय शोमधील त्याच्या दमदार अभिनयासाठी आणि लाडक्या भूमिकांसाठी ओळखला जाणारा टीव्ही स्टार व्हिव्हियन डिसेना हा आघाडीचा स्पर्धक मानला जातोय.
विवियनने वहबिजला 2 कोटी रुपयांची पोटगी दिली
प्यार की ये एक कहानी सह-कलाकार, वहबिझ दोराबजीशी लग्न केले होते परंतु 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटानंतर, डीसेनाचे इजिप्शियन पत्रकार नूरन अलीसोबत पुन्हा प्रेम झाले. 2022 मध्ये त्यांनी लग्न केले आणि आता त्यांना एक सुंदर मुलगीही आहे. वाहबिझ ही विवियनची पूर्वपत्नी आहे. 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्याने पोटगी म्हणून दोन कोटी रुपयेही घेतल्याचे सांगितले जाते. पतीच्या संपत्तीत पत्नीचा २० टक्के हक्क असल्याचे अभिनेत्याने म्हटले होते. तिच्यापासून वेगळे झाल्यानंतर अभिनेत्याने धर्म बदलला. तो ख्रिश्चनातून मुस्लिम झाला होता.