bhool bhulaiyaa 3 : ओरिजनल मंजुलिकाचं कमबॅक, रूहबाबाचीही एन्ट्री; 'भूल भुलय्या 3 ' चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?
रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन एक नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे तर त्याच दिवशी कार्तिक आर्यन चा भुलभुलय्या थ्री चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे .
Bhool Bhulaiyaa 3 Trailer out: मंजुलिकाच्या पैंजणाच्या आवाजाने अस्वस्थ झालेला अक्षय कुमार आणि कॉमेडी हॉरर आणि थ्रिलर भुलभुलय्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत असलेला भुलभुलय्या 2 ही चांगलाच गाजला होता . आता बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा बहुचर्चित चित्रपट 'भुलभुलय्या 3 ' चा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आला आहे . दिवाळीच्या मुहूर्तावर भुलभुलय्या थ्री प्रदर्शित होणार असल्याचं ट्रेलरमध्ये सांगण्यात आलंय . 3 मिनिट 50 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये विद्या बालनने साकारलेली मंजूलिका आणि गृह बाबा कार्तिक आर्यनची धमाकेदार एंट्री दाखवण्यात आली आहे .
कधी होणार भुलभुलय्या 3 प्रदर्शित ?
अनिस बज्मी दिग्दर्शित भुलभुलय्या 3 च्या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन सह विद्या बालन ,माधुरी दीक्षित,तृप्ती डिमरी ,राजपाल यादव ,विजयराज ,संजय मिश्रा,अश्विनी काळसेकर यांच्यासह अनेक स्टार्स दिसत आहेत . दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 1 नोव्हेंबरला भुलभुलय्या 3 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे .
सिंघम अगेन भुलभुलय्या थ्री आमने सामने
रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन एक नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे तर त्याच दिवशी कार्तिक आर्यन चा भुलभुलय्या थ्री चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे . त्यामुळे बॉक्स ऑफिसवर आता कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे . कार्तिकने 'भूल भुलैया 2' मध्ये रूह बाबाची भूमिका साकारली आहे. 'भूल भुलैया 2'मध्ये कार्तिक आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसले होते. कोरोनाच्या काळात प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केली होती.
सिंघम अगेन ने चित्रपटापूर्वीच रचलाय इतिहास
7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला सिंघम अगेनच्या ट्रेलर न प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला आहे .या चित्रपटाचा ट्रेलर 24 तासात सर्व प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिला जाणारा ट्रेलर बनला . आता बुधवारी प्रदर्शित करण्यात आलेल्या कार्तिक आर्यनचा भुलभुलय्या 3 चित्रपटाचा ट्रेलर ही प्रदर्शित करण्यात आलाय .आता मंजुलिका आणि सिंघम या दोघांपैकी कोण बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरणार ? हे पाहणं तितकंच मनोरंजक असणार आहे .