Entertainment: ॲक्शन पॅक राईड, गुंडांना गारद करणारी फायटिंग, KGF, कांतारानंतर हा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेक्षकांची उत्सूकता खिळवून ठेवणारा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे.
![Entertainment: ॲक्शन पॅक राईड, गुंडांना गारद करणारी फायटिंग, KGF, कांतारानंतर हा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला Entertainment After KGF and Kantara This South India Action Film Trailer Launch Watch here Entertainment: ॲक्शन पॅक राईड, गुंडांना गारद करणारी फायटिंग, KGF, कांतारानंतर हा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/22/8e8bf78928f1482e29a595188b93efab17295745250941063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bagheera Trailer Video: दक्षिण भारतीय सिनेमे म्हणजे बेफाम फाइटिंग, प्रेक्षकांना खेळवून ठेवणारा ॲक्शन पट, उत्कंठा वाढवणारे नाविन्यपूर्ण कथानक. केजीएफ , कांतारा अशा चित्रपटांनंतर आता या सिनेमाच्या मेकर्सने एका नव्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केलाय. बघिरा असे या सिनेमाचं नाव असून उत्सुकतेची डरकाळी असं म्हणत हा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. केजीएफ कांतारा आणि सालारचे निर्माते होंबाळे फिल्म्स निर्मित बगिरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . 31 ऑक्टोबरला हा चित्रपट (Bagheera Trailer) सर्व चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे .
एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रात्रीचा अंधारात गुंडांना मारतो आणि नंतर घटनांचा असा वळसा पडतो की हा पोलीसच मोस्ट वॉन्टेड होतो . तडफदार फाइटिंग सीन्स, ॲक्शन चा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे .
ट्रेनवरची फायटिंग,साउथ स्टाईल ॲक्शन
श्री मुरली आणि रुक्मिणी यांच्या प्रमुख भूमिका असणारा बगीरा हा चित्रपट धमाकेदार ॲक्शन सीन्सने भरलेला आहे . ट्रेनच्या छतावर दमदार फायटिंग, पोलिसांचा थरकाप उडवणारी साउथ स्टाईल ॲक्शन यांना प्रेक्षकांच्या उत्सुकताच ताणल्या गेल्या आहेत .
सिनेमाचं प्रोडक्शन आणि स्टारकास्ट
केजीएफ आणि कांतारा या सिनेमांचे निर्माते यांनी ॲक्शन पॅक राइड साठी तयार व्हा असे लिहीत बगीराया चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर लॉन्च केला आहे . होंबळे फिल्म्स या प्रोडक्शन हाऊस मधून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे . श्री मुरली, रुक्मिणी वसंत , प्रकाश राज , रंगायणारघू , अच्युत कुमार , गरुड राम हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत . प्रशांत निल यांची ही कथा आहे. प्रेक्षकांची उत्सूकता खिळवून ठेवणारा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे.
दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार बघीरा
दिवाळीत बघीरा हा ॲक्शनने पूर्ण भरलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा ३१ ऑक्टोबरला रिलिज होणार आहे. केजीएफ आणि कांताराच्या बॉक्स ऑफीसवर मिळालेल्या यशानंतर दिवाळीत हा सिनेमा येणार असल्यानं हा चित्रपट किती कमाई करतो याविषयी उत्सूकता लागून आहे. कमाल ॲक्शन सिन्स, धमाकेदार ट्रेलर अशी जोरदार सुरुवात या सिनेमाची झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना दिवाळीत मनोरंजनाची पर्वणीच मिळणार आहे यात शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)