Entertainment: घटस्फोटाच्या चर्चांना ब्रेक! निम्रत कौरसमोर अभिषेकनं केलं ऐश्वर्याचं कौतुक, म्हणाला 'ती माझ्यासाठी कायमच भावनिक आधार'
अभिषेक बच्चनची निम्रत कौरशी जवळीक असल्याचा दावाही करण्यात येत होता. दरम्यान, एका मुलाखतीत निम्रत कौरसमोर अभिषेक बच्चन यांनं ऐश्वर्याचं कौतुक केल्याचं दिसलं.
Abhishek Bacchan: विश्वसुंदरी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून कानावर येत आहेत. ऐश्वर्या आणि तिची मुलगी बच्चन कुटुंबासोबत राहत नसल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर अंबानी कुटुंबाच्या लग्नात अमिताभ, अभिषेक, जया आणि मुलीसह पोहोचले, पण ऐश्वर्या राय तिच्या मुलीसह आराध्यासह वेगळी पोहोचल्याचं दिसलं. यानंतरच या कपलच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना हवा मिळाली. या दोघांनीही घटस्फोटाच्या बातम्यांवर कोणतंही स्पष्टीकरण मिळालं नाही, त्यामुळेच या दोघांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान अभिषेक बच्चनची निम्रत कौरशी जवळीक असल्याचा दावाही करण्यात येत होता. दरम्यान, एका मुलाखतीत निम्रत कौरसमोर अभिषेक बच्चन यांनं ऐश्वर्याचं कौतुक केल्याचं दिसलं. ऐश्वर्या ही भावनिक आधार असल्याचं अभिषेक म्हणाला. निम्रत कौरसोबत दासवी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तो बोलत होता.
माझी पत्नी खूप चांगली
अभिषेक म्हणाला, "माझी पत्नी यात खूप चांगली आहे. ती नेहमीच माझ्यासाठी एक भावनिक आधार आहे. मी यासाठी खूप भाग्यवान आहे. असं अभिषेक म्हणाला. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्याचे कौतुक केले आणि म्हटले की, 'माझी पत्नी या बाबतीत उत्कृष्ट आहे. ती नेहमीच माझ्यासाठी भावनिक आधार आहे. मी खूप भाग्यवान आहे, माझे संपूर्ण कुटुंब देखील भाग्यवान आहे. ऐश्वर्यासारखी जोडीदार मिळण्याची सर्वात चांगली बाब म्हणजे ती या इंडस्ट्रीतली आहे.ती अशी व्यक्ती आहे जिनं तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातून मार्ग काढले आहेत. अत्यंत सन्मानाने मी तिच्याबद्दल कौतुक करतो, आम्ही खूप, अतिसंवेदनशील आहोत आणि आम्ही एकमेकांकडून खूप काही घेऊ शकतो.
अभिषेकच्या कौतूकानं सारं अलबेल झाल्याची चर्चा
ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंब यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात असतानाच आता एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत होती. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं नात संपलं असल्याचं व्हायरल पोस्टमध्ये बोललं जात होतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यासंदर्भातील एक पोस्ट चर्चेत आली होती. महत्त्वाचं म्हणजे अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला प्रेमात धोका दिला असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात येत होता. अभिषेकने ऐश्वर्याला धोका दिल्याने ऐश्वर्या आणि त्याच्या नात्यात दुरावा आला असल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं होतं. दरम्यान, त्यानं केलेल्या जाहीर कौतुकानं सारं अलबेल असल्याचं पुन्हा बोललं जात आहे.