एक्स्प्लोर

कलाकारांचे पैसे बुडवले,मंदार देवस्थळींच्या वादावर स्पष्टच बोलली 'एलिझाबेथ एकादशी'फेम अभिनेत्री, म्हणाली..

दरम्यान एलिझाबेथ एकादशी फेम अभिनेत्रीने मंदार देवस्थळींसोबत काम करतानाच अनुभव शेअर केलाय.

Nandita Patekar on Mandar Devasthali: गेल्या काही दिवसांपासून सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक मंदार देवस्थळी चर्चेत आहे तो पैसे थकवल्याच्या धक्कादायक आरोपांनंतर. अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियावर मंदार देवस्थळीने 5 लाख रुपये थकवल्याचा आरोप करत त्याच्यासोबत झालेल्या चॅटस आणि फोनवर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिपही शेअर केलेली. यानंतर संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वात मोठी खळबळ उडाली होती. अनेकांनी शशांक केतकरला पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान एलिझाबेथ एकादशी फेम अभिनेत्रीने मंदार देवस्थळींसोबत काम करतानाच अनुभव शेअर केलाय.

काय म्हणाली नंदिता देवस्थळी?

मराठी अभिनेत्री नंदिता पाटकरने माझे पती सौभाग्यवती या  मराठी मालिकेत अभिनेता वैभव मंगलसोबत मुख्य भूमिका साकारली होती. हा तिचा मालिकेतला पहिला अनुभव होता. या मालिकेचं दिग्दर्शन मंदार देवस्थळींचं  होतं. नुकतंच तिने 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंदारसोबत काम करतानाच अनुभव शेअर केलाय. ती म्हणाली," माझे पैसे बुडाले असं कधी झालं नाही. कधीकधी उशिरा मिळाले पण मिळालेच नाहीत असं घडलं नाही. एखाद्याचे पैसे बुडवणे हे त्रासदायक आहे खरंतर. कोणाची बाजू बरोबर कोणाची बाजू चुकीचे हे सांगता नाही येणार. पण हे त्रासदायक आहे. आपण इतकी मेहनत करतोय आणि आपल्याला पैसे नाही मिळत. शेवटी आपली रोजीरोटी आहे. आधीच मालिकांमध्ये कलाकारांना तीन महिने उशिरा पैसे मिळतात.

 'माझे पती सौभाग्यवती' मालिकेत काम करतानाचा माझा अनुभव चांगला होता. मंदारचे त्या काळात काही प्रॉब्लेम्स नव्हते तसे. त्याचं  स्वतःच प्रोडक्शन होतं  ते. मी त्याच्याच मालिकेत काम केलं. मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं. ती माझी पहिलीच मालिका होती. मला सिरीयलचा कसलाच अनुभव नव्हता. जसे परेश मोकाशी माझे चित्रपटाची पहिले डिरेक्टर तास मंदार देवस्थळी माझा मालिकेतला पहिला दिग्दर्शक .

मंदार देवस्थळीने खूप शिकवलं 

मला खूप शिकायला मिळालं. एकत्र तो खूप क्रिएटिव्ह आहे. उभे राहा आणि डायलॉग म्हणा असं नाही पण तो नाटकाच्या पद्धतीने त्या सगळ्या सीन्सची तालीम घ्यायचा. मग एखाद्या सिन मधील इमोशन कसे काढ, जर मी पाठमोरी आहे आणि समोरचा डायलॉग म्हणतोय तेंव्हा तू ठोकळ्यासारखी उभारून नाही चालणार, जरी तुझी पाठ असेल तरी तू त्यावर काम केलं पाहिजेस. अशा छोट्या छोट्या गोष्टी तो सांगायचा. तेंव्हा तोही चांगल्या स्थितीत होता. सिनेमे, मालिका सुरु होत्या. मला नाही वाटत कोणी मुद्दामून असं करेल. मला असा काही अनुभव नाही आला. कदाचित एखाद्याचा पडता काळ सुरु होतो. 

कलाकाराच्या हातात बोलण्यापलीकडे काही नसतं  

आपले पैसे बुडू नयेत यासाठी कलाकारांच्या हातात खरंतर काहीच नसतं. काय करणार तुम्ही. जसं शशांक ज्या पद्धतीने बोलतोय..तसं  आपण फक्त वाचा फोडू शकतो फारतर.  फारफारतर आपण त्यावर बोलू शकतो. पण एखाद्याने जर ठरवलंच असेल कि द्यायचेच नाहीत पैसे तर ...कॉन्ट्रॅक्ट असतात. त्यामुळे तुम्ही कायदेशीर काही पावलं उचलू शकता. सोशल माध्यमावर तुम्ही बोलू शकता त्यामुळे लोक अलर्ट होतात. असं नंदिता पाटेकर म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget