Eko OTT Release Date: घनदाट जंगल, गूढ रहस्य अन् डोक्याचा भुगा करणारा शेवट; OTT वर हिंदीत पाहा 8.3 IMDb रेटिंगची 'ही' फिल्म
Eko OTT Release Date: 'एक्को' चा क्लायमॅक्स प्रेक्षकांना अवाक करतो. हा सिनेमा आता OTT प्लॅटफॉर्मवर आणि हिंदी डब केलेल्या वर्जनमध्ये प्रदर्शित होत आहे.

Eko OTT Release Date: ओटीटीवर (OTT Released) अनेक सिनेमे रिलीज होत असतात. त्यापैकी काही सिनेमांच्या कथा आपल्या मनाचा ठाव घेतात. त्या अशा असतात, ज्या सिनेमा संपल्यानंतरही डोक्यात, मनात सुरूच असतात. कधीकधी तर त्या पुरतं अस्वस्थ करणाऱ्या असतात, तर कधीकधी त्या मनात विचारांचं काहूर माजवतात. अशाच एका कथेवर आधारित 'एक्को' हा मल्याळम सिनेमा 21 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. केवळ 5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटानं जगभरात 46.71 कोटी रुपयांची कमाई केली. IMDb वर 8.3 च्या सर्वोच्च रेटिंगसह तो वर्षातील सर्वाधिक गाजलेला मॉलिवूड सिनेमा ठरला. याची कथा एका प्रसिद्ध डग ब्रीगेडच्या गायब होण्यापासून सुरू होते. सिनेमात एका दुर्मिळ जातीचा कुत्रा दावण्यात आला आहे. त्या डॉग ब्रीगेडचा भूतकाळ मात्र काळोख्या अंधारात बुडालेला आहे. प्रत्येक पात्र काही गुप्त हेतूनं संधी शोधतंय. दरम्यान, क्लायमॅक्स प्रेक्षकांना अवाक करतो. हा सिनेमा आता OTT प्लॅटफॉर्मवर आणि हिंदी डब केलेल्या वर्जनमध्ये प्रदर्शित होत आहे.
दिनजीथ अय्याथन दिग्दर्शित, 'एक्को' हा एक मल्याळम रहस्यमय थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये संदीप प्रदीप, विनीत, नारायण, बिनू पप्पू आणि बियाना मोमिन ही स्टारकास्ट झळकली आहे. 'किष्किंधा कांडम' (2024) आणि 'केरळ क्राइम फाइल्स 2' (2025) नंतर, बहुल रमेश यांच्या 'अॅनिमल ट्रायलॉजी' मधील हा तिसरा आणि शेवटचा चित्रपट आहे.
Eko ची कहाणी काय?
कथेची सुरुवात मोहन पोथनपासून होते. तो केरळ-कर्नाटक सीमेजवळील एका लॉजवर पोहोचतो, त्याचा मित्र कुरियाचन, जो गायब झालेला एक हाय-प्रोफाइल गुन्हेगार आहे, त्याचं घर शोधत असतो. अप्पूटी त्याला जीपनं पश्चिम घाटातील कुरियाचनच्या दुर्गम इस्टेटमध्ये घेऊन जातो, जिथे पोथन कुरियाचननं अनेक वर्षांपूर्वी मलेशियातून आणलेल्या दुर्मिळ कुत्र्यांच्या जाती मिळवण्याचा त्याचा हेतू उघड करतो. तो प्रजननासाठी एक मादी हस्की आणली आहे. पण काही मिनिटांनंतर, पोथनचा मृतदेह सापडतो. असं मानलं जातं की, तो एका कड्यावरून पडला होता आणि त्यानंतर हस्की देखील उपासमारीनं मरण पावला.
कुरियाचनची मलेशियन पत्नी
कुरियाचनची मलेशियन पत्नी म्लाथी आहे, जी घरात पीयियस नावाच्या नोकरासह राहते. मंगळुरूचा एक माणूस पीयियसला भेटायला येतो, जो नौदलात असल्याचा आणि कुरियाचनचा साथीदार असल्याचा दावा करतो. तो कुरियाचनबद्दल कोणतीही माहिती देणाऱ्या पीयियसला मोठं बक्षीस देण्याचं आश्वासन देतो. म्लाथी पीयियसला सांगते की, तिचं खरे नाव सोयी आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान कुरियाचन आणि मृत मोहन पोथन यांनी सोयीच्या घरी ब्रिटिश मलेशियात तिच्या पतीच्या शुद्ध जातीच्या कुत्र्यांचा अभ्यास करण्यासाठी भेट दिली होती. जपानी हल्ल्यात तिचा पती मरण पावला आणि त्यानंतर कुरियाचननं सोयीशी लग्न केलं. यानतर पुढे जे घडतं, ते खरंच डोकं भडावणारं आहे.
Eko OTT रिलीज डेट
Eko हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आता, ओटीटी प्लॅटफॉर्मनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तारीख जाहीर केली आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "जंगलात अनेक रहस्य दडलेली आहेत, उत्तरे तिथेही मिळतील का? 31 डिसेंबर 2025 पासून नेटफ्लिक्सवर 'एक्को' हा चित्रपट मल्याळम, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेत पाहा..."























