एक्स्प्लोर

अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या मालकीच्या या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओतून जाहीर आवाहन केले होते.

ठाणे : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण (Usha chavan) यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआरच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिलासा दिला. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय देईपर्यंत त्यांनी या टीडीआर व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आजच उषा चव्हाण यांनी ठाण्यातील आनंदाश्रमात जाऊन त्यांना मिळालेला व्ही. शांताराम पुरस्कार आपण सरकारला परत करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, त्यांनी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) यासंदर्भात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार, शिंदेंनी याप्रकरणात तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. 

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या मालकीच्या या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आवाहन करणारा एक व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला होता. यानंतर त्यांचे पती दत्तात्रय कडू देशमुख यांनीही पुण्यातील काही प्रसार माध्यमांकडे त्यांची बाजू मांडली होती. 26 वर्षापासून त्यांचा या जमिनीचा वाद कोर्टात सुरू होता. अखेर न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ याचा या जमिनीवरील दावा मान्य केला होता. मात्र तरीही पुण्यातील गोयल गंगा या  खाजगी विकासकाने या जमिनीचा टीडीआर आपल्या नावे केल्याने उषा चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. 

आपल्या मुलासह आज सकाळी त्या ही मागणी घेऊन ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात आल्या. तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना त्यांनी आपल्या येण्याचे कारण सांगितले. त्यांनी तत्काळ अभिनेते निर्माते मंगेश देसाई यांना याबाबत अवगत केले. त्यांनी उषा चव्हाण यांचे म्हणणे सविस्तर समजून घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती दिली. यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून, पुणे महानगरपालिकेने केलेला हा टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती द्यावी. तसेच दोन्ही पक्ष आणि विकासक तसेच पुणे मनपा यांची स्वतंत्र सुनावणी आपल्यासमोर घेण्यात यावी. यावेळी सर्व पक्षांनी आपापले म्हणणे आणि कागदपत्र सादर करावीत. सर्व बाबी तपासून त्यानंतरच या व्यवहाराला मान्यता देण्यात येईल असे स्पष्ट केले. 

यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश देसाई यांच्या फोनवरून उषा चव्हाण यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण या व्यवहाराला तात्पुरती स्थगिती दिलेली असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असे स्पष्ट केले. पुढील सुनावणी वेळी आपणही आपली सर्व कागदपत्रे सादर करावी त्यावेळी कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निर्णय घेऊ असे सांगून त्यांना आश्वस्त केले. यावेळी उषा चव्हाण यांनीही आपल्या प्रश्नाची तत्काळ दखल घेऊन दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंगेश देसाई यांचे आभार मानले. स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचे काम आपल्याला माहित होते, त्यांचा वारसा आपण आणि आपले सहकारी चालवत आहात याची मला पूर्ण कल्पना आहे. आज त्यांच्याच आश्रमात आल्यावर आपण माझी तत्काळ दखल घेऊन दिलासा दिलात त्याबद्दल धन्यवाद दिले तसेच आपण या विषयात लक्ष घातल्याने आता या प्रकरणाला वेग येईल आणि मला आणि माझ्या मुलाला नक्की न्याय मिळेल असा विश्वास उषा ताईंनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा

नागपुरात नितीन गडकरींच्या कार्यक्रमात घोषणाबाजी, आंदोलकांची बॅनरबाजी; केंद्रीयमंत्री म्हणाले, पोलिसांनी बाहेर काढावं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Siddharth Jadhav Wins Filmfare Award: सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
Kangana Ranaut On Gen Z: तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Embed widget