एक्स्प्लोर

Drishyam 3 Box Office Collection: ‘दृश्यम 3’ नं बॉक्स ऑफिस हादरलं; 48 तासांत 6 सिनेमांना धोबीपछाड, अवघ्या 2 दिवसांत कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले

चित्रपटाची वाढती कमाई पाहता येत्या काही दिवसांत ‘दृश्यम 3’ आणखी मोठे रेकॉर्ड मोडणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Drishyam 3 Box Office Collection: मोहनलालचा बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’( Drishyam 3) सिनेमा रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ घेऊन आला आहे. सस्पेन्स, थ्रिल आणि जबरदस्त कथानकामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतलं आहे. अवघ्या 48 तासांतच या सिनेमाने विक्रमी कमाई करत अनेक मोठ्या मल्याळम सिनेमांना मागे टाकलं आहे.(Box office collection) 

दृश्यम 3 चं 48 तासांचं कलेक्शन किती?

जीतू जोसेफ दिग्दर्शित ‘दृश्यम 3’ची रिलीजपूर्वीपासूनच मोठी चर्चा होती. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही सिनेमाने दमदार कामगिरी केली होती. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 15.85 कोटी रुपयांची कमाई करत शानदार ओपनिंग घेतली. दुसऱ्या दिवशी कमाईत थोडी घट झाली असली, तरी चित्रपटाने 11.05 कोटींचं नेट कलेक्शन केलं. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, दोन दिवसांत ‘दृश्यम 3’चं भारतातील नेट कलेक्शन 26.90 कोटींवर पोहोचलं आहे, तर ग्रॉस कलेक्शन 31.18 कोटी रुपये झालं आहे.

विदेशात ‘दृश्यम 3’चा जलवा

भारतात कमाईत किंचित घसरण झाली असली, तरी परदेशात मात्र मोहनलालच्या सिनेमाचा दबदबा कायम आहे. रिपोर्टनुसार, दुसऱ्याच दिवशी चित्रपटाने विदेशात जवळपास 20 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे ‘दृश्यम 3’ची एकूण ओव्हरसीज कमाई 45 कोटींवर पोहोचली आहे. याचबरोबर चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन अवघ्या दोन दिवसांत 76.18 कोटी रुपयांवर गेलं आहे.

6 सिनेमांना टाकलं मागे

‘दृश्यम 3’ने जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मल्याळम चित्रपटांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. अवघ्या 48 तासांतच या चित्रपटाने सहा सिनेमांना मागे टाकत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सध्या 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मल्याळम चित्रपटांच्या यादीत ‘वाझा 2’, ‘आडू 3’ आणि ‘पैट्रियट’ या चित्रपटांनंतर ‘दृश्यम 3’ने स्थान मिळवलं आहे.

वर्ल्डवाइड 2026 च्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या टॉप 10 मल्याळम फिल्म..(जगभरातले ग्रॉस कलेक्शन )

वाझा 2: 238.46 कोटी
आडू 3: 121.31 कोटी
पैट्रियट: 80.51 कोटी
दृश्यम 3: 76 - 78 कोटी (2 दिवस )
अथिराडी: 54.69 कोटी
भरतनाट्यम 2 मोहिनीअट्टम: 40.63 कोटी
चथा पाचा: 33.47 कोटी
प्रकम्बनम: 20.86 कोटी
पल्लीचट्टंबी: 14.49 कोटी
आशाकाल आयराम: 12.71 कोटी

प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद

सोशल मीडियावरही ‘दृश्यम 3’ची जोरदार चर्चा सुरू आहे. मोहनलालच्या अभिनयाचं कौतुक होत असून चित्रपटातील ट्विस्ट आणि क्लायमॅक्स प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. अनेकांनी या चित्रपटाला फ्रेंचायझीतील सर्वात दमदार भाग असल्याचं म्हटलं आहे. चित्रपटाची वाढती कमाई पाहता येत्या काही दिवसांत ‘दृश्यम 3’ आणखी मोठे रेकॉर्ड मोडणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Advertisement

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget